[ad_1]
नवी दिल्ली ः युक्रेनमधील सुमी या शहरामध्ये रशियन फौजा अक्षरशः आग ओकू लागल्या असून येथे अडकून पडललेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आज सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारला(Central Government) सुटकेचे आवाहन केले आहे. आमच्याकडील खाद्यपदार्थ आणि पाणी देखील संपू लागले असून परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच सरकारने (government)आम्हाला येथून बाहेर काढावे असे आवाहन त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले .
या विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधीनंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत त्यातून त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. या विद्यार्थ्यांपैकीच एक असलेल्या महेक शेख या विद्यार्थिनीने याबाबतची आठ सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. सध्या शहरामध्ये पूर्ण ब्लॅकआउट(Blackout)असून वीज पूर्णपणे गेली आहे. बॉम्बस्फोटांमुळे पाण्याचा पुरवठा देखील खंडित झाला आहे. नेटवर्क देखील स्लो असल्याचे महेकने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. राधिका संगवान या विद्यार्थिनीने सूमी शहरामध्ये अजून सातशे ते आठशे विद्यार्थी अडकून पडल्याचा दावा केला असून त्यांच्या सुटकेबाबत मोठी अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले.
हे हि पहा :
सूमीमधील बस, रेल्वेसेवा ठप्प झाली असून पूल देखील उद्ध्वस्त झाल्याने लोकांना नेमके जायचे कोठे? हेच समजेनासे झाले आहे. सगळे मार्ग बंद करण्यात आले असून दूतावासाकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याने आमच्या चिंता वाढल्या असल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. येथील विद्यार्थ्यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.