खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढ


जळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी सुरू आहे. दरात दिवाळीनंतर चांगली सुधारणा झाली आहे.

खानदेशात जिनींग प्रेसिंग कारखाने दिवाळीनंतर वेगात सुरू झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ५५ कारखाने कापसावर प्रक्रिया करीत आहेत. दिवाळी काळातही कारखाने वेगात सुरू होते. राज्यात इतरत्र पाऊस झाला, पण जळगाव, धुळे भागात कोरडे व निरभ्र वातावरण असल्याने कापूस प्रक्रियेत अडथळा आला नाही. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू आहे.

सप्टेंबरमध्ये सुरवातीला ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात मोठी वाढ गेल्या दोन महिन्यात झाली आहे. पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागात कापसाची खेडा खरेदी ८६०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली आहे. हा या हंगामातील कापसाला खेडा खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे.

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात कार्यरत आहेत. खरेदीला पुन्हा एकदा वेग आल्याने रोज मोठी उलाढाल होत आहे. सध्या रोज एक लाख क्विंटल कापसाची आवक खानदेशात (नंदुरबार वगळता) होत आहे. दरवाढीमुळे आवकही वाढेल. कारण अनेक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दराची प्रतीक्षा होती.

यातच कापूस उत्पादनातील घटीमुळे खानदेशात गाठींचे उत्पादनही गेल्या वर्षापेक्षा दोन ते अडीच लाख गाठींनी कमी होईल, असे सांगितले जात आहे. यामुळेदेखील कापसाची पळवापळवी सुरू असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया…
खानदेशात सध्या रोज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक होत आहे. गुजरात, मध्य प्रदेशातूनही मागणी आहे. शिवाय खानदेशातील कारखानदारांकडूनही गाठींचा मोठा पुरवठा सूतगिरण्यांसह परदेशात केला जात आहे. कापसाचा तुटवडा जाणवत असल्याने दरवाढ सुरूच आहेत. पुढेही दर टिकून राहतील.
– अरविंद जैन, सदस्य,
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती) 

News Item ID: 
820-news_story-1636391594-awsecm-812
Mobile Device Headline: 
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढ
Appearance Status Tags: 
Tajya News
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढखानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढ
English Headline: 
agriculture news in marathi Cotton prices rises in local direct purchase in Khandesh regionSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X