खानदेशात केळी दरांवर दबाव वाढताच 

जळगाव ः खानदेशात गेल्या १५ दिवसांत केळी दरावर दबाव वाढतच राहिला आहे. कमी दर्जाच्या (वापसी) केळीला खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती असून ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलने या कमी दर्जाच्या केळीची विक्री करावी लागत आहे. दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

सध्या आगाप लागवडीच्या नवती बागांमध्ये यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात काढणी सुरू झाली आहे. जळगाव, धुळे भागातील कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. पण उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी या महिन्यात किंवा गेल्या २०-२२ दिवसात सुरू झाली आहे. यात कमी दर्जाच्या, आखूड केळीला दर कमी मिळत आहेत. खरेदीदारदेखील खरेदीदासाठी नकार देत आहेत. शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव भागात उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. तसेच धुळ्यातील शिरपुरातही कांदेबाग केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. उत्तरेकडील बाजारात दर्जेदार केळीला मागणी आहे. सध्या प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत होत आहे. व्यापाऱ्यांनी अधिक आवकेत नफेखोरी सुरू केली आहे. व्यापारी एकमेकांच्या संपर्कात असतात. कुठे, कशी केळी आहे, कुठे केळीची पाहणी केली, याची माहिती ही मंडळी एकमेकांमध्ये शेअर करते. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. 

दर्जेदार केळीला १०३० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर होत आहे. परंतु या दरातही खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रावेर बाजार समिती दर जाहीर करते, पण या दरात खरेदी केली जात नाही. कमी दरात खरेदीसंबंधी कारवाई केली जात नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुक्याचे सहनिबंधक कार्यालय बोटचेपी भूमिका घेत आहे. कुठेही कमी दरात खरेदीबाबत कारवाई झालेली नसल्याने व्यापाऱ्यांना जणू रान मोकळे असल्याची स्थिती आहे.  

News Item ID: 
820-news_story-1637326687-awsecm-394
Mobile Device Headline: 
खानदेशात केळी दरांवर दबाव वाढताच 
Appearance Status Tags: 
Section News
As pressure mounts on banana prices in KhandeshAs pressure mounts on banana prices in Khandesh
Mobile Body: 

जळगाव ः खानदेशात गेल्या १५ दिवसांत केळी दरावर दबाव वाढतच राहिला आहे. कमी दर्जाच्या (वापसी) केळीला खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती असून ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलने या कमी दर्जाच्या केळीची विक्री करावी लागत आहे. दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

सध्या आगाप लागवडीच्या नवती बागांमध्ये यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात काढणी सुरू झाली आहे. जळगाव, धुळे भागातील कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. पण उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी या महिन्यात किंवा गेल्या २०-२२ दिवसात सुरू झाली आहे. यात कमी दर्जाच्या, आखूड केळीला दर कमी मिळत आहेत. खरेदीदारदेखील खरेदीदासाठी नकार देत आहेत. शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव भागात उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. तसेच धुळ्यातील शिरपुरातही कांदेबाग केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. उत्तरेकडील बाजारात दर्जेदार केळीला मागणी आहे. सध्या प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत होत आहे. व्यापाऱ्यांनी अधिक आवकेत नफेखोरी सुरू केली आहे. व्यापारी एकमेकांच्या संपर्कात असतात. कुठे, कशी केळी आहे, कुठे केळीची पाहणी केली, याची माहिती ही मंडळी एकमेकांमध्ये शेअर करते. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. 

दर्जेदार केळीला १०३० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर होत आहे. परंतु या दरातही खरेदी केली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रावेर बाजार समिती दर जाहीर करते, पण या दरात खरेदी केली जात नाही. कमी दरात खरेदीसंबंधी कारवाई केली जात नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुक्याचे सहनिबंधक कार्यालय बोटचेपी भूमिका घेत आहे. कुठेही कमी दरात खरेदीबाबत कारवाई झालेली नसल्याने व्यापाऱ्यांना जणू रान मोकळे असल्याची स्थिती आहे.  

English Headline: 
agriclture news in marathi,As pressure mounts on banana prices in Khandesh
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon खानदेश केळी banana आग रावेर मुक्ता धुळे dhule व्यापार शेअर
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, केळी, Banana, आग, रावेर, मुक्ता, धुळे, Dhule, व्यापार, शेअर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
As pressure mounts on banana prices in Khandesh
Meta Description: 
As pressure mounts on banana prices in Khandesh
जळगाव ः खानदेशात गेल्या १५ दिवसांत केळी दरावर दबाव वाढतच राहिला आहे. कमी दर्जाच्या (वापसी) केळीला खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती असून ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलने या कमी दर्जाच्या केळीची विक्री करावी लागत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X