[ad_1]
जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बाष्पीभवन व गाळ यामुळे हा जलसाठा कमी दिसत आहे. यातच जळगाव जिल्ह्यात गिरणा व धुळ्यात पांझरा नदीत नदीकाठची टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची किंवा आवर्तनाची प्रतीक्षा आहे.
खानदेशात एकूण मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा ५२ टक्के एवढा आहे. यात जळगाव जिल्ह्यातील हतनूर (ता. भुसावळ) येथील तापी नदीवरील हतनूर धरणातील जलसाठा घटत आहे. या धरणात ३५ टक्के गाळ आहे. उर्वरित सुमारे ६५ टक्के पाणी असते. या धरणातून भुसावळ पालिका, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव येथील आयुध नि्रमाणी येथे पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणात गाळ अधिक असल्याने जलसाठा झपाट्याने कमी होऊन सुमारे ४५ टक्के जलसाठा राहिला आहे. रब्बीसाठी तीनदा या धरणातून आवर्तन सोडण्यात आले.
चाळीसगाव (जि.जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील साठाही सुमारे ५५ टक्के एवढा आहे. यातून रब्बीसाठी तीनदा आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच नदीत दोनदा टंचाई निवारणार्थ पाणी सोडले आहे. आता आणखी टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. कारण नदीकाठी टंचाई तयार होत आहे. सार्वजनिक जलस्त्रोतांवर परिणाम होत असून, अनेक मोठ्या गावांमध्ये दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
नदीकाठी देखील टंचाई
धुळ्यातील पांझरा धरणातूनही नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. पांझरा धरणाचे पाणी धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा व जळगावमधील अमळनेर तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे. या नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. यामुळे पाण्याची मागणी केली जात आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.