खानदेशात तेरा लाख कापूस गाठींची आवक

जळगाव ः  खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योगही गतीने सुरू आहे. सुमारे १३ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक बाजारात झाली आहे. आवक गेल्या १० ते १२ दिवसांत बऱ्यापैकी वाढली आहे. यंदा उत्पादनात किंचित घटीचा अंदाज आहे. 

नोव्हेंबरच्या मध्यात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू झाले. सुरुवातीला प्रक्रिया बऱ्यापैकी सुरू होती. पण ओमिक्रॉन विषाणू आल्यानंतर प्रक्रियेची गती कमी झाली. परंतु या विषाणूचे धोके व इतर बाबी या बाबीत स्पष्टता आल्यानंतर प्रक्रिया उद्योगाने गती घेतली. या उद्योगात मागणी वाढली. यामुळे कापूस दरातही डिसेंबरच्या अखेरीस किंचित सुधारणा झाली. या महिन्यात दरात चांगली सुधारणा देखील झाली. कापसाचा पुरवठा प्रक्रिया उद्योगांना सुरळीत आहे. सुमारे १५० जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात सुरू आहे. दर वर्षी सुमारे २२ ते २३ लाख गाठींचे उत्पादन या उद्योगात घेतले जाते. यंदा यात दोन ते तीन लाख गाठींची घट येईल, असे सांगितले जात आहे. डिसेंबरअखेरपर्यंत बाजारात सुमारे १३ लाख गाठींची आवक झाली आहे. 

गाठींची मागणी कायम
गाठींची मागणी देशातील सूतगिरण्या व बांगलादेशात कायम आहे. मुंबई व इतर भागातील मोठे निर्यातदार देखील कापूस गाठींची प्रक्रिया उद्योगांकडून खरेदी करीत आहेत. कापूस गाठींचे दरही वाढले आहेत. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांचा नफाही वाढणार आहे. खंडीला (३५६ किलो रुई) ७० हजार रुपयांवर दर आहेत. तर सरकीचे दरही ३५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक आहेत. कापसाची आवक टिकून आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाची चाके पुढेही गतीने फिरतील.

खानदेशातील काही कारखानदारांनी मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, विदर्भातील बुलडाणा येथूनही कापूस खरेदी सुरू केली आहे. खानदेशात गुजरात, मध्य प्रदेशातील कारखानदार गावोगावी कापूस खरेदी करीत आहेत. कापूस गाठींच्या उत्पादनात मोठी घट नाही. 

News Item ID: 
820-news_story-1641826009-awsecm-373
Mobile Device Headline: 
खानदेशात तेरा लाख कापूस गाठींची आवक
Appearance Status Tags: 
Section News
Of registered warehouses Only lend on mortgage receipts
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Of registered warehouses Only lend on mortgage receipts
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
खानदेश कापूस जळगाव jangaon बांगलादेश मुंबई mumbai नांदेड nanded औरंगाबाद aurangabad विदर्भ vidarbha गुजरात मध्य प्रदेश madhya pradesh
Search Functional Tags: 
खानदेश, कापूस, जळगाव, Jangaon, बांगलादेश, मुंबई, Mumbai, नांदेड, Nanded, औरंगाबाद, Aurangabad, विदर्भ, Vidarbha, गुजरात, मध्य प्रदेश, Madhya Pradesh
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Of registered warehouses Only lend on mortgage receipts
Meta Description: 
Of registered warehouses
Only lend on mortgage receipts
खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योगही गतीने सुरू आहे. सुमारे १३ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक बाजारात झाली आहे. आवक गेल्या १० ते १२ दिवसांत बऱ्यापैकी वाढली आहे. यंदा उत्पादनात किंचित घटीचा अंदाज आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment