खानदेशात २०० टक्के रब्बी पेरणीची शक्यता

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची पेरणी २०० टक्के म्हणजेच किमान चार लाख हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. ही पेरणी वेगात सुरू असून, दादर ज्वारी व हरभऱ्याच्या पेरणीने वेग घेतला आहे.

हरभऱ्याची सुमारे सव्वालाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी अपेक्षित आहे. दादर ज्वारी व संकरित ज्वारीची देखील किमान लाखभर हेक्टरवर पेरणी होईल. तसेच गहू, मका व इतर पिकांची पेरणीदेखील होईल. जळगाव जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील सुमारे २५ टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाची पेरणी अपवादानेच झाली आहे. पण तापी, अनेर, पांझरा आदी नदीकाठी काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारी, हरभरा पेरणी पूर्ण होत आली आहे.

धुळ्यात सुमारे ७० ते ८० हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल. तेथेही दादर ज्वारी, हरभरा पेरणीने वेग घेतला आहे. नंदुरबारात गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक होईल. अतिपावसाने काही भागांत नापेर क्षेत्रात मोठे गवत वाढले. ते नष्ट करून पूर्वमशागतीला अडथळे येत आहेत. दोनदा शेत रोटाव्हेटर करावे लागत आहेत. यानंतर बैलजोडीनेदेखील काही शेतकरी पूर्वमशागत किंवा शेत भुसभुशीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांची पेरणी लांबली आहे.

कांदा लागवडीची तयारी
कांदा लागवडीचीदेखील तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. महागडे किंवा १५०० ते २०००, ३००० रुपये प्रतिकिलो दराचे बियाणे शेतकऱ्यांनी खऱेदी केले आहे. पण जळगाव, जामनेर आदी भागांत अनेक शेतकरी कृषिपंपांची वीज बंद असल्याने कांदा बियाण्याची पेरणी रोपवाटिकेत करू शकले नाहीत, अशीही स्थिती आहे.

वीज बंदने अडचणी
खानदेशात अनेक भागात कृषिपंपांची वीज बंद केली आहे. मध्यंतरी जळगावात भाजपच्या शेतकरी मोर्चानंतर वीज पूर्ववत झाली. पण दोन दिवसांत या भागातही वीज बंद झाली. जळगाव तालुक्यात वीज सुरू केली होती, पण ती बंद करण्यात आली. फुपनगरी व लगतच्या भागात झिरो वायरमनकडून वीज बंद करून वीजबिलांची मागणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. वीज कंपनी हुकूमशाही राबवीत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया..
गहू, मका, कांदा रब्बी हंगामात लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. पण वीज कंपनीचे झिरो वायरमान, कंत्राटी कर्मचारी दादागिरी करून कृषिपंपांची वीज बंद करीत आहेत. जी वीज वापरलीच नाही, ते वीजबिल कसे भरणार. शासनाकडे शेतकऱ्यांचे घेणे आहे. ते शासनाने द्यावे. ऐन हंगामात वीज बंद करणे म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार आहे.
– प्रवीण पाटील, शेतकरी,
खेडी खुर्द, जि. जळगाव 

News Item ID: 
820-news_story-1636606403-awsecm-849
Mobile Device Headline: 
खानदेशात २०० टक्के रब्बी पेरणीची शक्यता
Appearance Status Tags: 
Mukhya News
perni_1.jpgperni_1.jpg
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi 200 percent rabbi sowing in Khandesh
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon खानदेश रब्बी हंगाम ज्वारी jowar गहू wheat नंदुरबार nandurbar वीज कंपनी company मात mate खेड
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, रब्बी हंगाम, ज्वारी, Jowar, गहू, wheat, नंदुरबार, Nandurbar, वीज, कंपनी, Company, मात, mate, खेड
Twitter Publish: 
Meta Keyword: 
200 percent rabbi sowing in Khandesh
Meta Description: 
200 percent rabbi sowing in Khandesh
जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची पेरणी २०० टक्के म्हणजेच किमान चार लाख हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. ही पेरणी वेगात सुरू असून, दादर ज्वारी व हरभऱ्याच्या पेरणीने वेग घेतला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X