खुशखबर; शेतकऱ्यांसाठी सरकार उपलब्ध करुन देणार २ लाख कोटी रुपयांचे कर्ज


मोदी सरकारने काही दिवसांपुर्वी देशातील काही शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज किसान क्रेडिट कार्डवर देणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर याआधी १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. यामध्ये जास्त फायदा होणार होता तो दूध उत्पादकांना. कारण दूध संघाशी जोडलेल्या दूध उत्पादकांना बँका कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देईल. तसेच सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी प्रोसेसिंग चार्ज घेतला जात होता. आता तो प्रोसेसिंग चार्ज देखील बंद करण्यात आला आहे. तसेच हे तीन लाख रुपयाचे कर्ज कुठलीच हमी न देता मिळणार.

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

तसेच आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत विशेष आर्थिक पॅकेजमध्ये किसान क्रेडिट कार्डच्या माध्यामातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देणार आहे.  आतापर्यंत ११.४८ लाख शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डसाठी कॉमन सर्विस सेंटर्सच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. तसेच अर्थ मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, आता देशातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल.  यासाठी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा डेटा वापरला जाणार आहे.

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वत च्या मालकीची शेती असावी अथवा तो व्यक्ती दुसऱ्याच्या शेतात काम करत असेल तर त्याच्याकडे जमिनीचा कस करार हवा. तसेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्ष ते ७५ वय वर्ष असावे.  ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या अर्जदारास सह अर्जदार आवश्यक असतो आणि तो अर्जदार हा आपल्या नातेवाईकांमधील असावा आणि त्याचे वय हे ६० वर्षापेक्षा कमी असावे.

महत्वाच्या बातम्या –

पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात परिवहन विभाग घेणार पुढाकार – परिवहनमंत्री

शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयातSource link

Leave a Comment

X