गगनबावडा तालुक्यात आणखी दोघेजण कोरोनाग्रस्त, एकूण रूग्णांचा आकडा चार


गगनबावडा। तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत भर पडत असून दोन दिवसात तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ वर गेली आहे. आज (गुरुवार) सायंकाळी तालुक्यातील आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. हे दोघेही वेतवडे गावचे रहिवाशी असून पनवेलमधून परतले होते. आज दिवसभरात तालुक्यात ३ रुग्ण सापडल्याने तालुकावासियांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालय. 

वेतवडे (गगनबावडा) हे २९ वर्षीय दोन्ही रूग्ण १६ मे रोजी खाजगी वाहनाने कोल्हापूरात आले होते. सिपीआर येथे स्वॅब दिल्यानंतर १७ मे रोजी गगनबावडा येथील समाज कल्याण निवासी शाळेच्या कोरोना सेंटरमध्ये कॉरंटाईन केले होते. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता या दोघांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. मंगळवारी अणदूरची महिला, बुधवारी तळये खुर्द मधील युवक तर आज वेतवडेचे दोघे असे चारजण कोरोणाग्रस्त सापडले आहेत. 

गगनबावडा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेसाठी चिंताजनक ठरत आहे. अणदूर, तळये खुर्द आणि वेतवडे ही तीनही गावे संसर्ग बाधित घोषित करण्यात आली आहेत.

Previous articleराज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत खरीप हंगाम २०२० आणि खत पुरवठ्याचे ‘असे’ आहे नियोजन

Source link

Leave a Comment

X