गगनबावडा तालुक्यात कोरोनाबाधित सापडला! | Lokshahi.News


कोल्हापूर। गगनबावडा तालुक्यात अखेर कोरोनाने प्रवेश केला असून एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील अंदूर येथे मुंबईवरून आलेला हा तरूण पॉझिटिव्ह निघाला असून सध्या तो गावातील शाळेत क्वारंटाईन आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर तरूणास कोल्हापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यास प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या असून त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी काही क्वारंटाईन्सला देखील हलवले जाणार आहे. तालुक्यात पहिलाच कोरोनाबाधित आढळल्य़ाने खळबळ उडाली आहे. 

Previous articleमोदी सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांना देणार १५ लाख रुपये, तुम्हालाही घेता येणार लाभ!

Source link

Leave a Comment

X