गगनबावड्यात कोरोनाचा ‘सहावा’ रूग्ण, तालुक्यात भितीचे वातावरण..!


गगनबावडा। तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आणखी एका तरूणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरूण ठाणे येथून आला असून सध्या गगनबावडा येथे क्वारंटाईन करण्यात आलेला आहे. बाधित रूग्ण हा तळये येथील रहिवाशी असून त्याचे वय २४ वर्ष आहे. 

ठाणे येथून प्रवास करून आल्यानंतर हा तरूण त्याच्या गावी न जाता थेट गगनबावडा येथील कोव्हिड केअर सेंटर येथे १७ मे रोजी क्वारंटाईन झाला आहे. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याचा रिपोर्ट नुकताच प्राप्त झाला असून सदर तरूणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गगनबावडा तालुक्यातील हा सहावा कोरोनाबाधित असून यापूर्वी १ महिला, १ लहान मूल आणि ३ तरूण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Previous articleशेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, ‘अशी’ होणार ‘थकबाकीदार’ शेतकऱ्यांची ‘कर्जमुक्ती’..!

Source link

Leave a Comment

X