गडचिरोलीत आठवडी बाजारांना परवानगी द्या

गडचिरोली ः नानाविध कारणांमुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. सामान्यांना आठवडी बाजारातून स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. त्यावरील निर्बंध हटवीत आठवडी बाजारांना परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. त्यानुसार, खरिपात पावसाळा लांबला. त्याच्या परिणामी भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. त्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढीचे सत्र सुरू केले. परिणामी, वाहतूक महागल्याने त्याचाही परिणाम भाजीपाला दरावर झाला. भाजीपाल्याच्या दरात अशाप्रकारे तेजी आली. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांऐवजी केवळ व्यापाऱ्यांनाच झाला. 

नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरीपेक्षा दुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ मध्ये आली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले.

आठवडी बाजारात शेतकरी थेट आपल्या शेतमालाची विक्री करू शकतात. त्यातून त्यांना थेट फायदा होतो. परंतु, कोरोनानंतर आठवडी बाजारावर निर्बंध लादले गेले. त्यामुळे ग्राहकांसोबत शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. हे लक्षात घेता जिल्ह्यात आठवडी बाजारांना परवागनी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. महादेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, सतीश विधाते, हसनअली गिलानी, शंकर सालोटरकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, पंडित पुडके, नेताजी गावतूरे, अरुण मुनघाटे, अनिल कोठारे यांनी केली.

News Item ID: 
820-news_story-1637500953-awsecm-552
Mobile Device Headline: 
गडचिरोलीत आठवडी बाजारांना परवानगी द्या
Appearance Status Tags: 
Section News
Allow weekly markets in GadchiroliAllow weekly markets in Gadchiroli
Mobile Body: 

गडचिरोली ः नानाविध कारणांमुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. सामान्यांना आठवडी बाजारातून स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. त्यावरील निर्बंध हटवीत आठवडी बाजारांना परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. त्यानुसार, खरिपात पावसाळा लांबला. त्याच्या परिणामी भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. त्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढीचे सत्र सुरू केले. परिणामी, वाहतूक महागल्याने त्याचाही परिणाम भाजीपाला दरावर झाला. भाजीपाल्याच्या दरात अशाप्रकारे तेजी आली. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांऐवजी केवळ व्यापाऱ्यांनाच झाला. 

नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरीपेक्षा दुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ मध्ये आली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले.

आठवडी बाजारात शेतकरी थेट आपल्या शेतमालाची विक्री करू शकतात. त्यातून त्यांना थेट फायदा होतो. परंतु, कोरोनानंतर आठवडी बाजारावर निर्बंध लादले गेले. त्यामुळे ग्राहकांसोबत शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. हे लक्षात घेता जिल्ह्यात आठवडी बाजारांना परवागनी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. महादेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, सतीश विधाते, हसनअली गिलानी, शंकर सालोटरकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, पंडित पुडके, नेताजी गावतूरे, अरुण मुनघाटे, अनिल कोठारे यांनी केली.

English Headline: 
Agriculture news in marathi Allow weekly markets in Gadchiroli
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोरोना corona काँग्रेस indian national congress नागपूर nagpur चंद्रपूर आमदार
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, काँग्रेस, Indian National Congress, नागपूर, Nagpur, चंद्रपूर, आमदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Allow weekly markets in Gadchiroli
Meta Description: 
Allow weekly markets in Gadchiroli
गडचिरोली ः नानाविध कारणांमुळे भाजीपाला दरात तेजी आली आहे. सामान्यांना आठवडी बाजारातून स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येतो. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. त्यावरील निर्बंध हटवीत आठवडी बाजारांना परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. 

Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X