Take a fresh look at your lifestyle.

गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ : पोपटराव पवार

0

नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर दिला. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले. गाव आदर्श करता आले. गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. गावकऱ्यांच्या श्रमातून पद्मश्री मिळाला अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ स्वीकारल्यानंतर बुधवारी (ता.१०) पोपटराव पवार यांचा आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये मिरवणूक काढून देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत गावकऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पोपटराव भावनिक झाले. ते म्हणाले, ‘‘लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेटने मला सहनशीलता शिकवली. त्याचाच उपयोग हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडला. गावात काम करण्यासाठी सहनशीलता आणि टीम वर्कला मोठे महत्त्व असते. हेच कौशल्य क्रिकेटमधून मिळाले आहे. दुसरी एक गोष्ट कटाक्षाने पाळली, ती म्हणजे राजकारणापासून दूर राहिलो. निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांकडून ऑफर येत होत्या. पण राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर देण्याचे ठरविले. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले.’’ 

‘‘गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. कोणतेही काम एकीशिवाय शक्य नाही. यापुढेही राज्याच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार आहे,’’ असे श्री. पवार म्हणाले. 

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, दत्ता काकडे, अशोकराव खरात, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, सरपंच विमल ठाणगे उपस्थित होते. 

राज्यात पाचशे गावे आदर्श करणार 
पोपटराव पवार म्हणाले, की आम्ही नेहमीच हिवरेबाजारसारखी गावे राज्यात आदर्श व्हावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काही वर्षांत राज्यातील पाचशे गावे हिवरेबाजार, राळेगणसिद्धीप्रमाणे आदर्श होणार आहेत. पाण्याचा ताळेबंद केल्यानेच हिवरेबाजारने दुष्काळावर मात केली. आता गावाच्या मालकीची शेततळी करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचे धोरण स्वीकारावे लागणार आहे. 

News Item ID: 
820-news_story-1636655364-awsecm-952
Mobile Device Headline: 
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ : पोपटराव पवार
Appearance Status Tags: 
Tajya News
पोपटराव पवार व गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. पोपटराव पवार व गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.
Mobile Body: 

नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर दिला. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले. गाव आदर्श करता आले. गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. गावकऱ्यांच्या श्रमातून पद्मश्री मिळाला अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ स्वीकारल्यानंतर बुधवारी (ता.१०) पोपटराव पवार यांचा आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये मिरवणूक काढून देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत गावकऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून गावातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पोपटराव भावनिक झाले. ते म्हणाले, ‘‘लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेटने मला सहनशीलता शिकवली. त्याचाच उपयोग हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडला. गावात काम करण्यासाठी सहनशीलता आणि टीम वर्कला मोठे महत्त्व असते. हेच कौशल्य क्रिकेटमधून मिळाले आहे. दुसरी एक गोष्ट कटाक्षाने पाळली, ती म्हणजे राजकारणापासून दूर राहिलो. निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांकडून ऑफर येत होत्या. पण राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर भर देण्याचे ठरविले. त्यामुळेच हिवरेबाजारकरांचे स्वप्न साकार होऊ शकले.’’ 

‘‘गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच दिल्लीत सन्मान स्वीकारताना मला माझ्या दगडधोंडे उचलणाऱ्या गावकऱ्यांची आठवण झाली. हीच ऊर्जा घेऊन मी काम करत आहे. कोणतेही काम एकीशिवाय शक्य नाही. यापुढेही राज्याच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार आहे,’’ असे श्री. पवार म्हणाले. 

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, दत्ता काकडे, अशोकराव खरात, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, सरपंच विमल ठाणगे उपस्थित होते. 

राज्यात पाचशे गावे आदर्श करणार 
पोपटराव पवार म्हणाले, की आम्ही नेहमीच हिवरेबाजारसारखी गावे राज्यात आदर्श व्हावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काही वर्षांत राज्यातील पाचशे गावे हिवरेबाजार, राळेगणसिद्धीप्रमाणे आदर्श होणार आहेत. पाण्याचा ताळेबंद केल्यानेच हिवरेबाजारने दुष्काळावर मात केली. आता गावाच्या मालकीची शेततळी करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचे धोरण स्वीकारावे लागणार आहे. 

English Headline: 
agriculture news in marathi efforts of fellow villages honored me with Padma Award say Popatrao pawar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पद्मश्री वन forest पोपटराव पवार नगर राजकारण politics विकास स्वप्न दिल्ली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आमदार सरपंच वर्षा varsha मात mate पाणी water
Search Functional Tags: 
पद्मश्री, वन, forest, पोपटराव पवार, नगर, राजकारण, Politics, विकास, स्वप्न, दिल्ली, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, आमदार, सरपंच, वर्षा, Varsha, मात, mate, पाणी, Water
Twitter Publish: 
Meta Keyword: 
efforts of fellow villages honored me with Padma Award say Popatrao pawar
Meta Description: 
efforts of fellow villages honored me with Padma Award say Popatrao pawar
गावकऱ्यांच्या श्रमातून पद्मश्री मिळाला अशी भावना पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X