गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष

कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही द्राक्ष बागेकडे फिरकेना. काही व्यापाऱ्यांनी १८ रुपये किलो इतका दर पाडून मागितला. देवळाली(ता.करमाळा) गावातील सुनील ढेरे यांच्या समोर काढणीला आलेली द्राक्षे विकायची कशी? असा प्रश्न पडला. पण परिस्थितीसमोर हार न मानता स्वतः द्राक्ष विक्रीचा निर्णय घेतला. तालुक्यातील गावा-गावात फिरून त्यांनी द्राक्षाची हातविक्री सुरु केली. बघता बघता वीस दिवसात त्यांनी १५ टन द्राक्षांची विक्री केली.

सुनील ढेरे यांच्याकडे साडे तीन एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्यांचे १४ जणांचे एकत्र कुटुंब वर्षभर बागेत राबते. यंदा द्राक्ष काढणीला आली आणि कोरोनामुळे लॅाकडाऊन जाहीर झालं, हाता-तोंडाशी आलेला घास कुणीतरी पळवावा, अशी स्थिती झाली. वेळ दवडूनही चालत नव्हतं. मार्ग तर काढायचा होता. परिस्थितीसमोर हार न मानता द्राक्षांची हातविक्री करण्याचा निर्णय घेतला. करमाळा शहरापासून दोन किलोमीटरवर देवळाली गाव आहे.

साहजिकच, करमाळा शहरासह आजूबाजूच्या पाच,दहा गावातही द्राक्ष विक्रीचे त्यांनी नियोजन केले. गाडीमध्ये एकावेळी २० क्रेट द्राक्ष ठेऊन गावोगावी विक्री सुरू केली. त्यापूर्वी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याशी चर्चाकरून वाहतूक आणि द्राक्ष विक्रीसाठीचा परवाना मिळविला आणि त्यांचा रोजचा प्रवास सुरु झाला.

शहरानजीक गाव असल्याने दिवसभरातून तीन-चार फेऱ्या करमाळ्यासह परिसरात होऊ लागल्या. घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली कायम गाडीत ठेवली. मास्क घातले. हात सतत धुतले. द्राक्ष घड विकताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं, हे सगळं ग्राहकांनाही दिसत होतं. त्यामुळे ग्राहकांकडून द्राक्ष खरेदीवरचा विश्वास वाढला.

सोशल मिडियाचा वापर
 सुनील यांनी गावोगावी द्राक्षाची विक्री केली, त्याचबरोबरीने व्हॅाट्सअॅप, फेसबुक माध्यमाचा वापर केला. द्राक्ष घरपोच मिळतील, असं मार्केटिंग केलं. या माध्यमातून द्राक्षाची मागणी होऊ लागली. त्यातून काही क्विंटल द्राक्ष विक्री झाली. काही लहान व्यापाऱ्यांनीही द्राक्ष खरेदीस सुरवात केली.

मिळविला ५० रुपये प्रति किलो दर
सुनील यांनी ग्राहकांना ५० रुपये आणि शहरातल्या फळविक्रेत्यांना ४० रुपये प्रति किलो दराने द्राक्ष विकली. यामध्ये दलालाची मध्यस्थी नाही, त्यामुळे सरसकट नफा मिळत गेला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वीस दिवसात त्यांनी सुमारे १५ टन द्राक्ष विक्रीतून सहा लाखांची कमाई केली. सध्या उरलेल्या १२ टन द्राक्षांचा तीन टन बेदाणा तयार केला आहे.

– सुनील ढेरे ७७२०९३५१६६

News Item ID: 
820-news_story-1590229708-453
Mobile Device Headline: 
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष
Appearance Status Tags: 
Mukhya News
Sunil Dhare in Grape farmSunil Dhare in Grape farm
Mobile Body: 

English Headline: 
Agricultural Agriculture News Marathi success story of Sunil Dhare,Davlali,Dist.Solapur
Author Type: 
External Author
सुदर्शन सुतार
द्राक्ष व्यापार
Search Functional Tags: 
द्राक्ष, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
success story of Sunil Dhare,Davlali,Dist.Solapur
Meta Description: 
success story of Sunil Dhare,Davlali,Dist.Solapur
देवळाली(ता.करमाळा) गावातील सुनील ढेरे यांच्या समोर काढणीला आलेली द्राक्षे विकायची कशी? असा प्रश्न पडला. पण परिस्थितीसमोर हार न मानता स्वतः द्राक्ष विक्रीचा निर्णय घेतला. तालुक्यातील गावा-गावात फिरून त्यांनी द्राक्षाची हातविक्री सुरु केली.Source link

Leave a Comment

X