गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार 

भडगाव, जि. जळगाव : गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. पहिले आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. येत्या २२ तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील साधारण: २५ हजार हेक्टरला या पाण्याचा लाभ मिळण्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटणार याकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. रब्बी हंगाम सुरू होऊनही आवर्तन सुटत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. त्या पार्श्‍वभूमीवर २२ नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. 

गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण २ हजार ६०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागण्याची शक्यता आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता साधारण २५ हजार हेक्टरपर्यंतच पाणी पोहोचते. 

यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र अतिवृष्टीने खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कापसावरही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पूर्वहंगाम कपाशी लागवडीसाठी गिरणा धरणातून मे महिन्यात किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

पाटचाऱ्या दुरुस्त व्हाव्यात 
गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येणार असले तरी अनेक भागात पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने पाटचाऱ्या दुरुस्तीसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

News Item ID: 
820-news_story-1637227951-awsecm-304
Mobile Device Headline: 
गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार 
Appearance Status Tags: 
Section News
Water will be released from Girna dam for rabi seasonWater will be released from Girna dam for rabi season
Mobile Body: 

भडगाव, जि. जळगाव : गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. पहिले आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. येत्या २२ तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील साधारण: २५ हजार हेक्टरला या पाण्याचा लाभ मिळण्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटणार याकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. रब्बी हंगाम सुरू होऊनही आवर्तन सुटत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. त्या पार्श्‍वभूमीवर २२ नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. 

गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण २ हजार ६०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागण्याची शक्यता आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता साधारण २५ हजार हेक्टरपर्यंतच पाणी पोहोचते. 

यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र अतिवृष्टीने खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कापसावरही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पूर्वहंगाम कपाशी लागवडीसाठी गिरणा धरणातून मे महिन्यात किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

पाटचाऱ्या दुरुस्त व्हाव्यात 
गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येणार असले तरी अनेक भागात पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने पाटचाऱ्या दुरुस्तीसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

English Headline: 
agriclture news in marathi,Water will be released from Girna dam for rabi season
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon धरण रब्बी हंगाम विभाग sections गुलाबराव पाटील खरीप अतिवृष्टी बोंड अळी bollworm
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, धरण, रब्बी हंगाम, विभाग, Sections, गुलाबराव पाटील, खरीप, अतिवृष्टी, बोंड अळी, bollwormSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X