ग्रामपंचायती डिसेंबरपर्यंत  फायबर ऑप्टिकने जोडणार : सतेज पाटील

अमरावती : फायबर ऑप्टिकने ग्रामपंचायती जोडणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती जोडल्या जातील, असा विश्‍वास गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 

भारतनेट, म्हाडा, प्रादेशिक परिवहन एसटी, तसेच आवास योजना या संबंधी गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये झाली, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंड्या, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
गृह राज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘‘भारतनेट आणि महानेट या दोन फेजमध्ये राज्याच्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे.

ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजनांबाबत माहिती मिळावी, हा उद्देश यामागे आहे. फायबर ऑप्टिकमुळे ८४५ ग्रामपंचायतमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ४४० आणि दुसऱ्या टप्प्यातील ३९९ पैकी २५० ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. फायबर ऑप्टिकलचे काही ठिकाणचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. याचा फायदा ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यात केवळ ग्रामपंचायती नाही तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा यांनाही जोडण्यात येणार आहे.

जिल्हा आणि तालुक्यांना ग्रामपंचायत स्तरावर काही महत्त्वपूर्ण संदेश द्यायचा असल्यास, माहितीची देवाण-घेवाण करावयाची असल्यास यामुळे मदत होईल. फायबर ऑप्टिक आरोग्य केंद्रांना जोडल्यामुळे गावात साथीचे रोग आल्यास अशी माहिती ताबडतोब राज्यस्तरावर देता येणे शक्य होणार आहे.’’ 

मेळघाटात पुरेशा बस फेऱ्या 
परिवहन महामंडळाचे उत्पन्न कोविड काळामध्ये कमी झाले आहे. अशावेळी एसटी बसेसला उत्पन्नाचे साधन असावे, म्हणून मालवाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. मेळघाटात पुरेशा प्रमाणात बस फेऱ्या उपलब्ध असाव्यात, यासाठी तेथील आवश्यकता व इतर बाबींचा अभ्यास करून तशी सुविधा धारणी व परिसरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडाअंतर्गत घरांसाठी लाभार्थ्यांना बँकांमार्फत त्वरित कर्ज मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास चोवीसशे घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. ते काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. आवास योजनांची कामे खोळंबता कामा नयेत. या कामांना प्राधान्य देऊन मिशनमोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
 
News Item ID: 
820-news_story-1635517068-awsecm-572
Mobile Device Headline: 
ग्रामपंचायती डिसेंबरपर्यंत  फायबर ऑप्टिकने जोडणार : सतेज पाटील
Appearance Status Tags: 
Section News
ग्रामपंचायती डिसेंबरपर्यंत  फायबर ऑप्टिकने जोडणार  Gram Panchayat till December Will be connected by fiber opticग्रामपंचायती डिसेंबरपर्यंत  फायबर ऑप्टिकने जोडणार  Gram Panchayat till December Will be connected by fiber optic
Mobile Body: 

अमरावती : फायबर ऑप्टिकने ग्रामपंचायती जोडणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती जोडल्या जातील, असा विश्‍वास गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 

भारतनेट, म्हाडा, प्रादेशिक परिवहन एसटी, तसेच आवास योजना या संबंधी गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये झाली, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंड्या, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
गृह राज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘‘भारतनेट आणि महानेट या दोन फेजमध्ये राज्याच्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविला जात आहे.

ग्रामपंचायत स्तरावर सर्व शासकीय योजनांबाबत माहिती मिळावी, हा उद्देश यामागे आहे. फायबर ऑप्टिकमुळे ८४५ ग्रामपंचायतमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ४४० आणि दुसऱ्या टप्प्यातील ३९९ पैकी २५० ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. फायबर ऑप्टिकलचे काही ठिकाणचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. याचा फायदा ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यात केवळ ग्रामपंचायती नाही तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा यांनाही जोडण्यात येणार आहे.

जिल्हा आणि तालुक्यांना ग्रामपंचायत स्तरावर काही महत्त्वपूर्ण संदेश द्यायचा असल्यास, माहितीची देवाण-घेवाण करावयाची असल्यास यामुळे मदत होईल. फायबर ऑप्टिक आरोग्य केंद्रांना जोडल्यामुळे गावात साथीचे रोग आल्यास अशी माहिती ताबडतोब राज्यस्तरावर देता येणे शक्य होणार आहे.’’ 

मेळघाटात पुरेशा बस फेऱ्या 
परिवहन महामंडळाचे उत्पन्न कोविड काळामध्ये कमी झाले आहे. अशावेळी एसटी बसेसला उत्पन्नाचे साधन असावे, म्हणून मालवाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. मेळघाटात पुरेशा प्रमाणात बस फेऱ्या उपलब्ध असाव्यात, यासाठी तेथील आवश्यकता व इतर बाबींचा अभ्यास करून तशी सुविधा धारणी व परिसरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडाअंतर्गत घरांसाठी लाभार्थ्यांना बँकांमार्फत त्वरित कर्ज मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळपास चोवीसशे घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. ते काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. आवास योजनांची कामे खोळंबता कामा नयेत. या कामांना प्राधान्य देऊन मिशनमोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
 
English Headline: 
Agriculture News in Marathi Gram Panchayat till December Will be connected by fiber optic
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
यती yeti सतेज पाटील satej patil जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका महापालिका आयुक्त विभाग sections ग्रामपंचायत आरोग्य health मेळघाट melghat उत्पन्न कर्ज पुढाकार initiatives
Search Functional Tags: 
यती, Yeti, सतेज पाटील, Satej Patil, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, महापालिका आयुक्त, विभाग, Sections, ग्रामपंचायत, आरोग्य, Health, मेळघाट, Melghat, उत्पन्न, कर्ज, पुढाकार, Initiatives
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Gram Panchayat till December Will be connected by fiber optic
Meta Description: 
Gram Panchayat till December
Will be connected by fiber optic
फायबर ऑप्टिकने ग्रामपंचायती जोडणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती जोडल्या जातील, असा विश्‍वास गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांनी व्यक्त केला. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X