घरबसल्या ‘या’ पध्दतीने काढा ‘किसान क्रेडीट कार्ड’… अगदी ‘फ्री’ आणि मिळवा १ लाख ६० हजार रूपये तेही विनातारण!

नवी दिल्ली।मोदी सरकार शेतकरी वर्गासाठी विविध योजना आणत असून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधावी हाच त्यामागचा हेतू आहे. सध्या देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत केली जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांना शेतीआधारित कर्जाची गरज आहे अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कर्जही उपलब्ध करून दिलं जात आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड कुठे आणि कशा पध्दतीने काढावं याची अजिबात माहिती नसते. त्यामुळे अनेक एजंट शेतकरी वर्गाला किसान क्रेडीट कार्ड काढून देण्याच्या नावाखाली लुटण्याचे काम करतात. परंतु किसान क्रेडीट कार्ड काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि साधी असून तुम्ही घरबसल्या देखील किसान क्रेडीट कार्डची नोंदणी करून कर्ज मिळवू शकता. हे कर्ज विनातारण १ लाख ६० हजार तर तारणावर ६ लाख रूपयांपर्यंत देखील कर्ज काढता येते. 

किसान क्रेडीट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला थोडेफार जरी मोबाईल तंत्रज्ञानाची माहिती असेल आणि तुमच्याकडे अॅड्रॉईड मोबाईल असेल तर अगदी मोफत किसान क्रेडीट कार्ड काढून कर्ज मिळवता येते. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. पीएम किसान योजनेत ज्या शेतकऱ्यांचा समावेश आहे अशा सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्याच्यापाशी अद्याप किसान क्रेडीट कार्ड नाही त्यांनी https://pmkisan.gov.in/  या लिंक वर जाऊन केसीसी फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. डाऊनलोड केलेला फॉर्म पीडीएफ फॉरमॅटमध्ये असल्याकारणाने त्याची प्रिंट काढून फॉर्ममध्ये आवश्यक ती माहिती भरावी. माहिती भरून झाल्यानंतर सदर फॉर्म आपल्या बॅंकेत जमा करावा. फॉर्म जमा केल्यानंतर साधारणतः १४ दिवसानंतर आपण दिलेल्या पत्यावर आपल्याला कार्ड मिळून जाईल. 

जर तुम्हाला लॉकडाऊनमुळे बॅंकेत जाणे शक्य नसेल तर ऑनलाईन पध्दतीनेही या https://eseva.csccloud.in/kcc/Default.aspx# वेबसाईटवरू कार्ड काढता येईल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे त्याचा लॉग इन आयडी असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला यासाठी (५० ते १०० रूपये) रक्कम मोजावी लागेल. आपल्या जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन अथवा सेवाकेंद्र धारकांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे ईमेल अथवा व्हाट्सअप करून देखील तुम्ही किसान क्रेडीट कार्ड घरबसल्या मिळवू शकता. (ऑनलाईन किसान क्रेडीट कार्ड काढून देणाऱ्या व्यक्तींशी स्वतः संपर्क साधून पैसे देण्याघेण्याचे व्यवहार खात्री असेल तरच करावे)

 • १ लाख ६० हजार रु. ते ६ लाख पर्यंत पीक कर्ज उपलब्ध
 • ३ लाख रूपयापर्यंतचे पीक कर्ज ४% व्याजदराने उपलब्ध
 • लॉकडाऊनमुळे घरगुती खर्चासाठी देखील मिळणार कर्ज
 • या योजनेची वैशिष्टये –
  • नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करता येते.
  • या शेतकऱ्यांनी अगोदर किसान क्रेडिट कार्ड काढले असेल तर त्याची कर्ज मर्यादा वाढवता येते.
  • ज्या शेतकाऱ्यांनी हि योजना बंद केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करून कर्ज घेता येते.
  • या योजनेमध्ये गाय, म्हैस, शेळी आणि कोंबडी पालन यासारख्या शेतीजोडधंद्यांना सुद्धा कर्ज घेता य.
  • आपल्या कुवतीप्रमाणे कर्ज मर्यादा वाढवता येते.
 • योजनेची पात्रता निकष
  • किसान सन्मान योजनांमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • आवश्यक कागदपत्रे
  • 1.आधार कार्ड, 2.बँक पासबुक, 3.सातबारा  (गट नंबरसाठी)

केसीसी कर्जाचा वेळेवर भरणा केल्यास शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जावर अधिक लाभ मिळू शकेल. रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना एक मार्गदर्शिका जारी केली आहे. त्याअंतर्गत, १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यान ज्यांची खाती बाकी आहेत किंवा होतील. अशा शेतकर्‍यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी २% व्याज सबवेशन (आयएस) आणि ३% च्या प्रॉम्प्ट रीपेमेंट इन्सेन्टिव्ह (पीआरआय) चा लाभ देण्यास सांगितले आहे.Source link

https://www.youtube.com/watch?v=6S-5YYVgIhM&t=12s

Leave a Comment

X