चुकीच्या बातमीचा टॉमेटोला फटका; कोट्यावधींचे नुकसान, उत्पादक चिंतेत..!


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी पोल्ट्री व्यवसायाला याचा फटका बसल्यानंतर आता टॉमेटोलाही असाच झटका बसला आहे. अर्धवट बातमी आणि सोशल मिडिया वरील अफवामुळे टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॉमेटो या पिकामध्ये विषाणूजन्य रोग आल्याच्या तक्रारी आणि फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर माध्यमांनी चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्यात. त्याचा थेट परीणाम आता शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी, सोशल माध्यमांनी अफवा पसरून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे.

‘टॉमेटोलाही विषाणूची लागण’ अशी बातमी माध्यमांनी दिली. त्यामुळे अनेकांचा असा गैरसमज झाला की, आता टॉमेटोला करोना विषाणूची लागण झाली असून टॉमेटोला कोविड १९ आजार झालेला आहे. त्यामुळे मागील ३ दिवसांत टॉमेटोची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. सरकारने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वजन कमी होत नाहीये? तर मग कलिंगड खा, वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीरSource link

Leave a Comment

X