[ad_1]
सोनभद्र, उत्तर प्रदेश: जगात भारताचे सामर्थ्य वाढले आहे. त्यामुळेच युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी मोठे अभियान राबविले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकी (Elections)निमित्त सोनभद्र येथे आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले, की ‘ऑपरेशन गंगा’ तंर्गत आतापर्यंत हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांना घरी आणले आहे. या अभियानाला गती देण्यासाठी चार मंत्र्यांना परदेशात (Abroad)पाठवले असून हवाई दलही अभियानात उतरले आहे. भारत सरकारने युक्रेनमधील (Ukraine)भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतीही हयगय केलेली नसल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताचे सामर्थ्य वाढल्याने युद्धकाळातही नागरिकांना सुरक्षितपणे आणण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले जात आहे. आज जगाची स्थिती आपण पाहत आहात. आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंतच्या चार टप्प्यांतील मतदानावरून भाजप आणि आघाडी पक्षाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बहुमत मिळणार असल्याचे सिद्ध झाले आहे. अपना दल, निषाद पक्ष असो किंवा भाजप असो सर्व उमेदवारांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. या आघाडीत उत्साह आणि आशेचा किरण दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारत सरकार आपल्या नागरिकांना परत आणण्यात कोणतीही कुचराई करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे हि पहा :
बदलत्या काळात भारताला अधिक सामर्थ्यवान व्हावे लागेल. दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची सवय कमी झाल्यास भारत आणखी सामर्थ्यशाली होईल. भारतीय जवानांच्या शौर्याचा अपमान करणारे, भारतीय उद्योजकांच्या मेहनतीने चालणाऱ्या मेक इंडिया अभियानाची चेष्टा करणारे मंडळी आत्मनिर्भर भारत अभियानाची थट्टा उडवतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

[ad_2]
Source link