जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा

सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडले असल्याने तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जत तालुका तसा विस्ताराने मोठा आहे. नेहमी दुष्काळ अशी या तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षांपासून जत तालुका तहानलेलाच पहायला मिळत आहे. पाण्यासाठी भटकंती करताहेत. पाण्याची टंचाई भासवण्यासाठी शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शेतीच्या पाण्यासाठी पैसे देऊनही टॅंकर मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी अनेकदा संघर्ष देखील झाला. परंतु, पाण्यचा प्रश्न मार्गी लागला नाही. इथली संपूर्ण शेती पावसाच्या भरवशावर आहे. परतीचा पाऊस झाला तरच रब्बी हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातात येतात, अशी परिस्थिती आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांत या तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा दिसाला मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत या तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नसल्याचे चित्र आहे. तलावात कमी अधिक पाणीसाठा शिल्लक राहतो आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसाने जत तालुक्यावर कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे तलाव शंभर टक्के भरले.

तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, पिण्यासाठी टॅंकरची आवश्यकता भासली नसल्याचे दिसते आहे. २०१९पासून पुराचे वाहून जाणारे पाणी हे जत तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करत आहे. यंदा पाणी टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन तलाव भरण्याचे नियोजन केले, त्यामुळे जत तालुक्यातील तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या पाणीसाठा मुबलक असल्याने द्राक्ष, डाळिंब पिकासह अन्य पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा देखील पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र सध्यातरी दिसते आहे.

News Item ID: 
820-news_story-1634738828-awsecm-702
Mobile Device Headline: 
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा
Appearance Status Tags: 
Section News
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा Abundant water supply in Jat this yearजतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा Abundant water supply in Jat this year
Mobile Body: 

सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत. तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडले असल्याने तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जत तालुका तसा विस्ताराने मोठा आहे. नेहमी दुष्काळ अशी या तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षांपासून जत तालुका तहानलेलाच पहायला मिळत आहे. पाण्यासाठी भटकंती करताहेत. पाण्याची टंचाई भासवण्यासाठी शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शेतीच्या पाण्यासाठी पैसे देऊनही टॅंकर मिळत नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी अनेकदा संघर्ष देखील झाला. परंतु, पाण्यचा प्रश्न मार्गी लागला नाही. इथली संपूर्ण शेती पावसाच्या भरवशावर आहे. परतीचा पाऊस झाला तरच रब्बी हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातात येतात, अशी परिस्थिती आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांत या तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा दिसाला मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत या तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नसल्याचे चित्र आहे. तलावात कमी अधिक पाणीसाठा शिल्लक राहतो आहे. गेल्या वर्षी देखील परतीच्या पावसाने जत तालुक्यावर कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे तलाव शंभर टक्के भरले.

तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, पिण्यासाठी टॅंकरची आवश्यकता भासली नसल्याचे दिसते आहे. २०१९पासून पुराचे वाहून जाणारे पाणी हे जत तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करत आहे. यंदा पाणी टंचाई भासू नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करुन तलाव भरण्याचे नियोजन केले, त्यामुळे जत तालुक्यातील तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या पाणीसाठा मुबलक असल्याने द्राक्ष, डाळिंब पिकासह अन्य पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा देखील पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र सध्यातरी दिसते आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Abundant water supply in Jat this year
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पाणी water म्हैसाळ सिंचन द्राक्ष डाळ डाळिंब दुष्काळ वर्षा varsha शेती farming प्रशासन administrations ऊस पाऊस रब्बी हंगाम सामना face विभाग sections पाणीटंचाई
Search Functional Tags: 
पाणी, Water, म्हैसाळ, सिंचन, द्राक्ष, डाळ, डाळिंब, दुष्काळ, वर्षा, Varsha, शेती, farming, प्रशासन, Administrations, ऊस, पाऊस, रब्बी हंगाम, सामना, face, विभाग, Sections, पाणीटंचाई
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Abundant water supply in Jat this year
Meta Description: 
Abundant water supply in Jat this year
जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२ दशलक्ष घनफूट इतके साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात १९५०.४६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने काही तलाव भरले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X