जत पूर्व भागातून मजूर उसतोडीसाठी रवाना

सांगली : जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत पूर्व भागातील जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड, वीटभट्टीवर काम करण्याशिवाय पर्याय नाही. पूर्व भागातील जनतेच्या नशिबी पुन्हा कोयता व पालच आले आहे. जत पूर्व भागातील २५ हजारांहून अधिक ऊसतोड मजूर पोटासाठी बिऱ्हाडासह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह व कर्नाटकात ऊसतोडीसाठी स्थलांतरित होत आहेत. जत तालुक्यातील काही मजूर शाळकरी मुलांना घेऊन ऊसतोडीसाठी जाताना दिसत आहेत. यंदाही त्यांची दीपावली उसाच्या फडातच साजरी होणार आहे.

दुष्काळ जत तालुक्याच्या पाचवीला पुजल्यासारखा आहे. यंदा या भागात २५ हजारांहून अधिक लोक जिल्ह्याच्या पश्चिम भागात ऊसतोडीसाठी लहान मुलांसह स्थलांतरीत होत आहेत. काही मजूर कर्नाटकातसुद्धा ऊसतोडी जात आहेत. जत तालुका दुष्काळ असल्याकारणाने मजुरांना हाताला काम मिळत नाही. मुकादमाकडून आगाऊ उचल म्हणून एक लाख रुपये विना व्याज घेतले जातात. टोळीत १२ ते १५ मजूर असतात. सहा महिने ऊस तोडीच्या फडात तर व सहा महिने गावी, अशी त्यांची अवस्था आहे.

दिवाळीच्या तोंडावर ट्रॅक्टर व ट्रक ऊसतोड मजुरांच्या नेण्यासाठी उभे आहेत. पूर्व भागातील संख, तिकोंडी, करेवाडी (ति), आसंगी तुर्क, पांढरेवाडी, सोन्याळ, अंकलगी, अक्कलवाडी, खंडनाळ, मोठेवाडी, लवंगा, लकडेवाडी, बोरगी, हळ्ळी, गिरगाव, मोरबगी, सोनलगीसह अनेक गावांतील लोक सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, रेठरे (शिवनगर) व कर्नाटकातील नाद, रेणुका, केंपवाड या साखर कारखान्यांस ऊसतोडसाठी जात आहेत.

कोरोना, कामामुळे शाळेला दांडी

काही मजूर मुलांमुलींना शाळा अर्धवट सोडून सोबत घेऊन जात आहेत. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. कोरोनास्थिती सुधारत असल्याने कारखाने सुरू झाले आहेत. मजूर ऊसतोडीच्या ठिकाणी मुलांना सोबत घेऊन जात असल्याने त्यांचा शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
News Item ID: 
820-news_story-1635773866-awsecm-638
Mobile Device Headline: 
जत पूर्व भागातून मजूर उसतोडीसाठी रवाना
Appearance Status Tags: 
Section News
The laborers from the eastern part of Jat left for UstodiThe laborers from the eastern part of Jat left for Ustodi
Mobile Body: 

सांगली : जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत पूर्व भागातील जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड, वीटभट्टीवर काम करण्याशिवाय पर्याय नाही. पूर्व भागातील जनतेच्या नशिबी पुन्हा कोयता व पालच आले आहे. जत पूर्व भागातील २५ हजारांहून अधिक ऊसतोड मजूर पोटासाठी बिऱ्हाडासह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह व कर्नाटकात ऊसतोडीसाठी स्थलांतरित होत आहेत. जत तालुक्यातील काही मजूर शाळकरी मुलांना घेऊन ऊसतोडीसाठी जाताना दिसत आहेत. यंदाही त्यांची दीपावली उसाच्या फडातच साजरी होणार आहे.

दुष्काळ जत तालुक्याच्या पाचवीला पुजल्यासारखा आहे. यंदा या भागात २५ हजारांहून अधिक लोक जिल्ह्याच्या पश्चिम भागात ऊसतोडीसाठी लहान मुलांसह स्थलांतरीत होत आहेत. काही मजूर कर्नाटकातसुद्धा ऊसतोडी जात आहेत. जत तालुका दुष्काळ असल्याकारणाने मजुरांना हाताला काम मिळत नाही. मुकादमाकडून आगाऊ उचल म्हणून एक लाख रुपये विना व्याज घेतले जातात. टोळीत १२ ते १५ मजूर असतात. सहा महिने ऊस तोडीच्या फडात तर व सहा महिने गावी, अशी त्यांची अवस्था आहे.

दिवाळीच्या तोंडावर ट्रॅक्टर व ट्रक ऊसतोड मजुरांच्या नेण्यासाठी उभे आहेत. पूर्व भागातील संख, तिकोंडी, करेवाडी (ति), आसंगी तुर्क, पांढरेवाडी, सोन्याळ, अंकलगी, अक्कलवाडी, खंडनाळ, मोठेवाडी, लवंगा, लकडेवाडी, बोरगी, हळ्ळी, गिरगाव, मोरबगी, सोनलगीसह अनेक गावांतील लोक सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, रेठरे (शिवनगर) व कर्नाटकातील नाद, रेणुका, केंपवाड या साखर कारखान्यांस ऊसतोडसाठी जात आहेत.

कोरोना, कामामुळे शाळेला दांडी

काही मजूर मुलांमुलींना शाळा अर्धवट सोडून सोबत घेऊन जात आहेत. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. कोरोनास्थिती सुधारत असल्याने कारखाने सुरू झाले आहेत. मजूर ऊसतोडीच्या ठिकाणी मुलांना सोबत घेऊन जात असल्याने त्यांचा शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
English Headline: 
Agriculture news in marathi, The laborers from the eastern part of Jat left for Ustodi
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पूर floods ऊस कर्नाटक स्थलांतर दुष्काळ व्याज दिवाळी ट्रॅक्टर tractor कोल्हापूर साखर कोरोना corona शिक्षण education
Search Functional Tags: 
पूर, Floods, ऊस, कर्नाटक, स्थलांतर, दुष्काळ, व्याज, दिवाळी, ट्रॅक्टर, Tractor, कोल्हापूर, साखर, कोरोना, Corona, शिक्षण, Education
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The laborers from the eastern part of Jat left for Ustodi
Meta Description: 
The laborers from the eastern part of Jat left for Ustodi
सांगली : जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत पूर्व भागातील जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड, वीटभट्टीवर काम करण्याशिवाय पर्याय नाही. पूर्व भागातील जनतेच्या नशिबी पुन्हा कोयता व पालच आले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X