जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ः कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

तीन कृषी कायदे माघारी घेण्याच्या घोषणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्ताने नम्र अभिवादन 
करतो.’’ 

कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज, गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली, त्याचे मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीने या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे वारंवार सांगितले आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा 
निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे, असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

बळिराजाच्या रेट्यापुढे झुकावे लागले : पटोले
मुंबई : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजप सरकारला झुकावे लागले असून, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असून, अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. शेतीमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा, ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
 
News Item ID: 
820-news_story-1637334050-awsecm-555
Mobile Device Headline: 
जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Appearance Status Tags: 
Mukhya News
The country knew the strength of the peopleThe country knew the strength of the people
Mobile Body: 

मुंबई ः कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

तीन कृषी कायदे माघारी घेण्याच्या घोषणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्ताने नम्र अभिवादन 
करतो.’’ 

कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज, गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली, त्याचे मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीने या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे वारंवार सांगितले आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा 
निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे, असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

बळिराजाच्या रेट्यापुढे झुकावे लागले : पटोले
मुंबई : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजप सरकारला झुकावे लागले असून, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असून, अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाला आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. शेतीमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा, ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
 
English Headline: 
Agriculture News in Marathi The country knew the strength of the people
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai आंदोलन agitation बळी bali विकास उत्तर प्रदेश भाजप विजय victory पराभव defeat महाराष्ट्र maharashtra महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस indian national congress नाना पटोले nana patole नरेंद्र मोदी narendra modi महात्मा गांधी शेती farming अजित पवार ajit pawar
Search Functional Tags: 
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, मुंबई, Mumbai, आंदोलन, agitation, बळी, Bali, विकास, उत्तर प्रदेश, भाजप, विजय, victory, पराभव, defeat, महाराष्ट्र, Maharashtra, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, काँग्रेस, Indian National Congress, नाना पटोले, Nana Patole, नरेंद्र मोदी, Narendra Modi, महात्मा गांधी, शेती, farming, अजित पवार, Ajit Pawar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The country knew the strength of the people
Meta Description: 
The country knew the strength of the people
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X