जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जाऊन आपले भाग्य आजमावण्याची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीतर्फे सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : श्‍यामकांत बळिराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (काँग्रेस), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडितराव पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी).

सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल
भाजपसहित सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनेल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो- राजीव रघुनाथ पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- सुरेश श्यामराव पाटील (काँग्रेस).

भाजप आमदार मात्र स्वतंत्र
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे; परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे श्री. सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे. 

News Item ID: 
820-news_story-1636606155-awsecm-198
Mobile Device Headline: 
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर
Appearance Status Tags: 
Tajya News
महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्करमहाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर
Mobile Body: 

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जाऊन आपले भाग्य आजमावण्याची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीतर्फे सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : श्‍यामकांत बळिराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (काँग्रेस), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडितराव पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी).

सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल
भाजपसहित सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनेल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो- राजीव रघुनाथ पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- सुरेश श्यामराव पाटील (काँग्रेस).

भाजप आमदार मात्र स्वतंत्र
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे; परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे श्री. सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे. 

English Headline: 
agriculture news in marathi Mahavikas Sahakar panel will clash with all-party Shetkari Panel In Jalgaon
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon जिल्हा बँक भारत विकास भाजप लढत fight मका maize काँग्रेस indian national congress रावेर वाघ आमदार संजय सावकारे sanjay sawkare निवडणूक
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, जिल्हा बँक, भारत, विकास, भाजप, लढत, fight, मका, Maize, काँग्रेस, Indian National Congress, रावेर, वाघ, आमदार, संजय सावकारे, Sanjay Sawkare, , निवडणूक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Mahavikas Sahakar panel will clash with all-party Shetkari Panel In Jalgaon
Meta Description: 
Mahavikas Sahakar panel will clash with all-party Shetkari Panel In Jalgaon
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X