Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरणावर भर

0

जळगाव : देशभरात लसीकरणाने शंभर कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातही घरोघरी जाऊन शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी जिल्हा कोविड लसीकरण टास्क फोर्सच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. या महिनाभरात पात्र सर्व लाभार्थी व महाविद्यालयांमध्येही मोहीम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी तथा टास्क फोर्सचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत विविध मुद्द्यांच्या आधारे आढावा घेण्यात आला व त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.

२० दिवसांच्या आत फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या त्या गावात, वॉर्डात घरोघरी जाऊन एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ४५ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आता दिवाळीनंतर १५, १६ व १७ नोव्हेंबरला लसीकरण मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करावे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्यासाठी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत लसीकरण उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, रेशन घेण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, डॉ. एम. एम. बन्सी, महापालिकेच्या डॉ. मनीषा उगले, आयपीएचे डॉ. नरेश नारखेडे, आयएमए प्रतिनिधी डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. राजेश पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, डॉ. प्रमोद पांढरे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आदी उपस्थित होते.

News Item ID: 
820-news_story-1636029299-awsecm-989
Mobile Device Headline: 
जळगाव जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरणावर भर
Appearance Status Tags: 
Section News
जळगाव जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरणावर भर जळगाव जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरणावर भर
Mobile Body: 

जळगाव : देशभरात लसीकरणाने शंभर कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातही घरोघरी जाऊन शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी जिल्हा कोविड लसीकरण टास्क फोर्सच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. या महिनाभरात पात्र सर्व लाभार्थी व महाविद्यालयांमध्येही मोहीम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी तथा टास्क फोर्सचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत विविध मुद्द्यांच्या आधारे आढावा घेण्यात आला व त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.

२० दिवसांच्या आत फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या त्या गावात, वॉर्डात घरोघरी जाऊन एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ४५ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आता दिवाळीनंतर १५, १६ व १७ नोव्हेंबरला लसीकरण मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करावे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्यासाठी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत लसीकरण उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, रेशन घेण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, डॉ. एम. एम. बन्सी, महापालिकेच्या डॉ. मनीषा उगले, आयपीएचे डॉ. नरेश नारखेडे, आयएमए प्रतिनिधी डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. राजेश पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, डॉ. प्रमोद पांढरे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आदी उपस्थित होते.

English Headline: 
Emphasis on door-to-door vaccination in Jalgaon district
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon लसीकरण vaccination आरोग्य health वर्षा varsha दिवाळी सकाळ वाघ
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, लसीकरण, Vaccination, आरोग्य, Health, वर्षा, Varsha, दिवाळी, सकाळ, वाघ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Emphasis on door-to-door vaccination in Jalgaon district
Meta Description: 
Emphasis on door-to-door vaccination in Jalgaon district
जळगाव : देशभरात लसीकरणाने शंभर कोटींचा टप्पा गाठल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातही घरोघरी जाऊन शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी जिल्हा कोविड लसीकरण टास्क फोर्सच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X