जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत. तरीही महिला राखीवमधून एका जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्याबाबत बदल होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी शनिवारी (ता. ६) शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जागा वाटपावर चर्चा झाली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा देण्यात आल्या आहेत, तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसची चार जागेची मागणी :
काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी त्यांनी आणखी एका जागेची मागणी केली आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी अडून आहेत. काँगेसला सद्या यावल, रावेर व चोपडा या तीन विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनाला जळगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी, इतर संस्था व महिला राखीव या जागा देण्यात आल्या आहेत. एसटी आणि व्हीजेएनटीची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीतर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

News Item ID: 
820-news_story-1636392042-awsecm-152
Mobile Device Headline: 
जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित
Appearance Status Tags: 
Mukhya News
जळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चितजळगाव : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्‍चित
Mobile Body: 

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत. तरीही महिला राखीवमधून एका जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्याबाबत बदल होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी शनिवारी (ता. ६) शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जागा वाटपावर चर्चा झाली. चोपडा येथील जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा देण्यात आल्या आहेत, तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला तीन जागा देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसची चार जागेची मागणी :
काँगेस पक्षाला तीन जागा देण्यात आल्या असल्या तरी त्यांनी आणखी एका जागेची मागणी केली आहे. महिला राखीवमधून त्यांनी धरणगाव येथील काँग्रेस नेते डी. जी. पाटील यांच्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी अडून आहेत. काँगेसला सद्या यावल, रावेर व चोपडा या तीन विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनाला जळगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा या चार विकास सोसायटीच्या जागा मिळाल्या आहेत. तर सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी, इतर संस्था व महिला राखीव या जागा देण्यात आल्या आहेत. एसटी आणि व्हीजेएनटीची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीतर्फे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

English Headline: 
agriculture news in marathi Jalgaon District bank election seat distribution completed by MVA
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon विकास शिवसेना shivsena काँग्रेस indian national congress जिल्हा बँक गुलाबराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party रावेर मुक्ता चाळीसगाव व्हीजेएनटी आमदार
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, विकास, शिवसेना, Shivsena, काँग्रेस, Indian National Congress, जिल्हा बँक, गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, रावेर, मुक्ता, चाळीसगाव, व्हीजेएनटी, आमदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Jalgaon District bank election seat distribution completed by MVA
Meta Description: 
Jalgaon District bank election seat distribution completed by MVA
जळगाव जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, काँग्रेस ३ जागा लढणार आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X