जागतिक कृषी व्यवस्था हवामान बदलाने धोक्यात

वॉशिंग्टन : जगभरातील विविध प्रदेशांत व प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादक देशांत हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. हे बदल असेच कायम सुरू राहिल्यास येत्या दशकामध्ये जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे खोल परिणाम जाणवतील अशी भीती शास्त्रज्ञांनी एका अभ्यास प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनीही नवे बदल जाणून घेऊन त्यानुसार पीक पद्धतींत बदल करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून मांडला आहे. 

हवामानशास्त्रज्ञ व पिकांचे विविध मॉडेल विकसित करण्यामधील तज्ज्ञ असलेल्या जोनास जॅगेरमेयर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हवामान बदलाचे संकेत व जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे होणारे परिणाम या विषयाच्या संदर्भाने अभ्यास प्रकल्प राबवला आहे. नासा या जगातील प्रसिद्ध संस्थेत जॅगेरमेयर कार्यरत आहेत. या संस्थेसोबत न्यूयॉर्क सिटी येथील कोलंबिया विद्यापीठातंर्गत ‘अर्थ इन्स्टिट्यूट’ तसेच ‘पोटसडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमॅट इंपॅक्ट रिसर्च’ या संस्थांनीही या अभ्यास प्रकल्पात सहभाग घेतला आहे. त्यातून मिळालेले निष्कर्ष ‘नेचर फूड’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. 

या अभ्यासातून हवामान बदलाचे संकेत व त्याचे जागतिक कृषी व्यवस्थेवर होत असलेले व होणारे संभाव्य परिणाम याबाबत निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. त्यानुसार जगभरातील विविध भागांमध्ये व त्यातही अन्नधान्य उत्पादक देशांत हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. जग त्याचा अनुभव घेत आहे. शेतकऱ्यांनीही हे नवे बदल जाणून घेऊन त्यांचा स्वीकार करायला हवा अशी सूचना मांडण्यात आली आहे. 

अभ्यास प्रकल्पातील शास्त्रज्ञ जॅगेरमेयर म्हणतात, की मानवी हस्तक्षेपांमुळे होत असलेल्या विविध घडामोडींमुळे हरितगृह वायूंचे प्रसारण होऊ लागले आहे. त्यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पर्जन्यमान पद्धती बदलल्या आहेत. हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. पिकांच्या वाढीवर या बदलाचा परिणाम होऊ लागला आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचे उत्पादन आता पूर्वीप्रमाणे स्थिर पातळीत न राहता बदलले आहे. हे हवामान बदल असेच पुढे सुरू राहिले तर येत्या दशकात जागतिक कृषी व्यवस्थेत व त्यातही अन्नधान्य उत्पादक देशांमध्ये त्याचे सखोल परिणाम घडण्याचा धोका स्पष्ट दिसत आहे. 

मका, गव्हातील संभाव्य बदल 
अभ्यासात हवामान बदल व पिकांची विविध मॉडेल्स यांचा मेळ घालून निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. त्यानुसार बदलत्या हवामानाला सुसंगत पद्धतीने शेतकऱ्यांनीही जलदगतीने बदलणे गरजेचे आहे. नुकसान टाळण्यासाठी पीक लागवडीचा प्रचलित कालावधी वा तारखा बदलणे किंवा विविध पीकवाणांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे अभ्यासात सूचित करण्यात आले आहे. शतकाच्या अखेरीपर्यंत मक्याचे उत्पादन एक चतुर्थांश पटीने घटण्याची तर गव्हाचे जागतिक उत्पादन १७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. माका हे अर्ध उष्ण तसेच उष्णकटिबंधीय अशा विविध प्रदेशांत घेतले जाणारे पीक आहे. उच्च तापमान असलेल्या प्रदेशांत मका पिकाला अन्य प्रदेशांच्या तुलनेत अधिक हानी पोहोचू शकते. उत्तर व मध्य अमेरिका, पश्‍चिम आफ्रिका, मध्य व पूर्व आशिया या प्रदेशांत येत्या काळात मक्याचे उत्पादन २० टक्क्यांनी घटू शकते अशी शक्यता आहे. गव्हाबाबत बोलायचे तर मध्यम तापमान असलेल्या हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे हवामान बदलाच्या आनुषंगिक उत्तर अमेरिका, कॅनडा व चीन आदी भागांमध्ये गव्हाची उत्पादकता चांगली येऊ शकते. 

अभ्यासानुसार पीक उत्पादनासाठी केवळ तापमान हा एकच घटक कारणीभूत नाही. तर कार्बन डायऑक्साइडची वातावरणात वाढलेली पातळी गव्हाच्या वाढीसाठी अनुकूल ठरू शकते. मात्र त्याच वेळी त्यातील पोषणमूल्यांमध्ये घट येऊ शकते. वाढलेल्या जागतिक तापमानाचा पर्जन्यमान पद्धतींशीही संबंध आहे. त्याचबरोबर उष्ण लाटेचे प्रवाह किंवा अवर्षण ज्या ज्या कालखंडाने उद्‍भवतील त्यानुसार पिकाचे आरोग्य व उत्पादकता यांना धोका पोहोचेल, असेही अभ्यासात म्हटले आहे. 

अन्नसुरक्षेला धोका 
आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या देशांतील मुख्य अन्नधान्य पिकांचे उत्पादन घटल्याचा मुख्य निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आला आहे. या देशांमध्ये यापूर्वीपासूनच अन्न सुरक्षा वा संपत्ती यांची परिस्थिती बिकट आहे. अशा नव्या परिणामांमुळे या परिस्थितीत आणखीच भर पडणार आहे. गरीब देशांतील शेतकरी प्रामुख्याने अल्पभूधारक आहेत. त्यांना पुरेसे अन्न मिळवणेही दुरापास्त असते. अशावेळी अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते. जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न समाजात होताना दिसत आहेत. तरी देखील जागतिक कृषी व्यवस्थेपुढे नव्या हवामान संकटाचे आव्हान उभे ठाकले आहे ही वस्तुस्थिती आहे.

News Item ID: 
820-news_story-1635953488-awsecm-773
Mobile Device Headline: 
जागतिक कृषी व्यवस्था हवामान बदलाने धोक्यात
Appearance Status Tags: 
Mukhya News
जागतिक कृषी व्यवस्था हवामान बदलाने धोक्यातजागतिक कृषी व्यवस्था हवामान बदलाने धोक्यात
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi The global agricultural system is threatened by climate change in coming decade
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
हवामान वॉशिंग्टन न्यूयॉर्क कोलंबिया कॅनडा चीन आरोग्य health
Search Functional Tags: 
हवामान, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कोलंबिया, कॅनडा, चीन, आरोग्य, Health
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The global agricultural system is threatened by climate change in coming decade
Meta Description: 
The global agricultural system is threatened by climate change in coming decade
जगभरातील अन्नधान्य उत्पादक देशांत हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. हे बदल असेच कायम सुरू राहिल्यास येत्या दशकामध्ये जागतिक कृषी व्यवस्थेवर त्याचे खोल परिणाम जाणवतील अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X