जिल्हा बॅंकतर्फे या तारखेपासून पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार | पीककर्ज वाटपाला सुरुवात

नमस्कार शेतकरी बंधूंना आम्ही कास्तकार च्या एका नवीन पोस्ट मध्ये तुमचं स्वागत शेतकरी बंधूंनो 2020 या वर्षासाठी नवीन पीक कर्ज वाटप कधीपासून सुरू होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु त्याचा आता एक ठोस निर्णय घेण्यात आलेला असून एक तोडगा सुद्धा निघालेला आहे तर एकंदरीत आपण आजच्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत की पीक कर्ज वाटप आला एकंदरीत सुरुवात किती तारखेपासून होणार आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया.

दृष्टीक्षेपात ठळक निर्णय

– गतवर्षाच्या पीककर्जाच्या पतरफेडीस ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ.
– ३१ मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना प्रथम प्राधान्याने कर्ज वाटप.
– पूर्ण पीककर्ज वाटप रुपे किसान क्रेडीट कार्ड मार्फत, ATM द्वारे होणार.
– चालू वर्षी वाढीव पिक कर्ज वाटप.
– शेतकऱ्यांनी ATM मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे.
– नविन हंगामासाठी नविन वाढीव पीक कर्जदर.

या तारखेपासून पिक कर्ज वाटपाला सुरुवात

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेमार्फत नविन हंगामातील पीक कर्ज वाटपाला १५ एप्रिलपासून सुरवात होत आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर परतफेड करणाऱ्यांना या कर्जासाठी प्राधान्य देण्यात येणार असून हे कर्ज प्रथमच एटीएमद्वारे वितरित होणार आहे. मागील वर्षीच्या पीककर्ज परतफेडीला ३१ मे २०२० पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ही माहिती दिली.
बॅंकेने याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जिल्हा बँकेने मागील वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेडीस ३१ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतवाढीच्या अनषंगाने सर्व पीक कर्जदार सभासदांनी त्यांच्याकडील पीककर्ज ३१ मे २०२० पर्यंत एक लाखापर्यंत ०% दराने व एक लाखांवरील पीककर्जासाठी २% व्याजदराने परतफेड करावयाची आहे.

पीककर्ज दरानुसार (उदा. मागील वर्षी कापूस पिकासाठी एकरी एकवीस हजारप्रमाणे वाटप करण्यात आले होते. चालू वर्षी कापूस या पिकासाठी एकरी चोविस हजार रूपयांप्रमाणे वाटप होईल. हे पीक कर्ज रुपे केसीसी क्रेडीट कार्डद्वारे ATM च्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे. कर्ज रक्कम जिल्हा बँकेच्या व इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून वीस हजार प्रमाणे प्रत्येक दिवशी उपलब्ध होईल. खते, बि-बियाणे, कीटकनाशके या सारख्या पेस्टीसाईडसाठी दैनंदिन रक्कम पंचविस हजारचे बिल पेमेंट ATM कार्डद्वारे करता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या अनुषंगाने रिझर्व बँकेकडून माहे मार्च, एप्रिल, मे २०२० या ३ महिन्या करीताATM साठी इतर बँकांकडून आकारण्यात येणारे चार्जेस आकारणी माफ करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा :

1 thought on “जिल्हा बॅंकतर्फे या तारखेपासून पासून एटीएमद्वारे पीककर्ज देणार | पीककर्ज वाटपाला सुरुवात”

  1. Pingback: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीकविम्याचे २४२४ कोटी वितरित, अशी पहा यादी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार

Leave a Comment

X