जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ संपल्याने नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी जी.आर. चिंताला यांची निवड करण्यात आली आहे. श्री. चिंताला यांनी नुकताच (ता.२७)पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री.चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सह संस्था ‘नॅबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
 
श्री.चिंताला हे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.`नाबार्ड’मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह हैदराबाद, लखनौ,चंदीगड,अंदमान आणि निकोबार, नवी दिल्ली आणि बेंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते `ॲग्री बिझनेस फायनान्स लि. हैदराबाद’चे दोन वर्ष उपाध्यक्ष तसेच बँकर ग्रामीण विकास संस्था लखनौचे संचालक राहिले आहेत.

तसेच श्री.चिंताला यांनी `प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्रित करण्यासाठी रोडमॅप` या विषयावर काम केले. ग्रामविकास मंत्रालयाच्या `स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता` या विषयावर सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांच्या शिफारशींमुळे देशभरात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करण्यासाठी मदत झाली. तसेच त्यांनी अंदमान व निकोबार येथे कार्यरत असताना तेथील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील नारळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य दर निश्चित करण्याकरिता शेतकरी उत्पादक संघटनेची सुरुवात केली होती.

News Item ID: 
820-news_story-1590822208-333
Mobile Device Headline: 
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
Appearance Status Tags: 
Tajya News
G R Chintala take charge as president of Nabard G R Chintala take charge as president of Nabard
Mobile Body: 

मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ संपल्याने नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी जी.आर. चिंताला यांची निवड करण्यात आली आहे. श्री. चिंताला यांनी नुकताच (ता.२७)पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री.चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सह संस्था ‘नॅबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
 
श्री.चिंताला हे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.`नाबार्ड’मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह हैदराबाद, लखनौ,चंदीगड,अंदमान आणि निकोबार, नवी दिल्ली आणि बेंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते `ॲग्री बिझनेस फायनान्स लि. हैदराबाद’चे दोन वर्ष उपाध्यक्ष तसेच बँकर ग्रामीण विकास संस्था लखनौचे संचालक राहिले आहेत.

तसेच श्री.चिंताला यांनी `प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्रित करण्यासाठी रोडमॅप` या विषयावर काम केले. ग्रामविकास मंत्रालयाच्या `स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता` या विषयावर सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांच्या शिफारशींमुळे देशभरात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करण्यासाठी मदत झाली. तसेच त्यांनी अंदमान व निकोबार येथे कार्यरत असताना तेथील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील नारळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य दर निश्चित करण्याकरिता शेतकरी उत्पादक संघटनेची सुरुवात केली होती.

English Headline: 
Agri Business News G R Chintala take charge as president of Nabard Nashik Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मुंबई नाबार्ड भारत हैदराबाद लखनौ विकास ग्रामविकास मंत्रालय वन नारळ शेती
Search Functional Tags: 
मुंबई, नाबार्ड, भारत, हैदराबाद, लखनौ, विकास, ग्रामविकास, मंत्रालय, वन, नारळ, शेती
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nabard economy farmers
Meta Description: 
G R Chintala take charge as president of Nabard
मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ संपल्याने नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी जी.आर. चिंताला यांची निवड करण्यात आली आहे. श्री. चिंताला यांनी नुकताच (ता.२७)पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री.चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सह संस्था ‘नॅबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.Source link

Leave a Comment

X