ज्वारीपेक्षा कडबा यंदा खातोय भाव 

नगर ः रब्बीत ज्वारीसोबत चाऱ्यासाठी कडबा महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा कडब्याचे चांगले उत्पादन निघाले आहे. मात्र बाजारात ज्वारीपेक्षा कडब्याला अधिक दर आहेत. त्यामुळे ज्वारीपेक्षा यंदा कडबाच अधिक भाव खात असल्याचे दिसत आहे. सध्या ग्रामीण भागात कडब्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यंदा एकरी सरासरी दोन ते तीन टन कडब्याचे उत्पादन निघाले आहे. 

राज्यात ज्वारीचे २० लाख २७ हजार २५८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा १६ लाख ३४ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन घेतले. यंदा परतीचा पाऊस सलग पंधरा दिवस पडला. त्यामुळे अनेक भागांत वेळेत ज्वारी पेरता आली नाही. त्याचा परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला आणि क्षेत्र घटले.

हवामान बदल, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारीच्या प्रत्यक्ष उत्पादनाला फटका बसला आहे. मात्र रब्बीत ज्वारीसोबत कडब्याचे उत्पादनही महत्त्वाचे मानले जात आहे. यंदा एकरी सरासरी दोन ते तीन टन कडब्याचे उत्पादन निघाले आहे. त्यामुळे सरासरी नगर जिल्ह्यात १० लाख टनांपेक्षा अधिक, तर राज्यात ८० ते ९० लाख टन कडब्याचे उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. 

नगरसह राज्यातील अनेक भागांत हाती आलेला कडबा बाजारात येऊ लागला असला, तरी सुरुवातीपासून कडब्याचे दर तेजीत दिसत आहेत. सध्या बाजारात नगरमध्ये ज्वारीला १८०० ते ३३०० रुपये क्विंटल दल मिळत आहे. तर कडब्याला प्रति टन ४ हजार ते साडेपाच हजारांपर्यंत दर मिळत आहे. शेकड्यालाही तीन हजारांच्या जवळपास दर आहे. त्यामुळे बाजारात ज्वारीपेक्षा कडबाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. 

पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक 
बाजारात कडब्याला मागणी अधिक असते. साधारण मार्च ते जूनपर्यंत कडब्याची खरेदी-विक्री होते. जनावरांसाठी वाळलेला सकस आहार म्हणून कडब्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दूध व्यावसायिक, शेळीपालन करणारे शेतकरी कडब्याला प्राधान्य देतात. मात्र मागणीच्या तुलनेत नेहमीच कडब्याचा तुटवडा होत असल्याचे दिसून आले आहे. ज्वारीच्या ओल्या कडवळालाही मागणी चांगली असते. बहुतांश भागात शेतकरी जागेवरच कडब्याची विक्री करतात. 
 
News Item ID: 
820-news_story-1615731619-awsecm-170
Mobile Device Headline: 
ज्वारीपेक्षा कडबा यंदा खातोय भाव 
Appearance Status Tags: 
Mukhya News
nagar fodder nagar fodder
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi jowar fodder has market than jowar Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ज्वारी नगर ऊस पाऊस हवामान दूध शेळीपालन
Search Functional Tags: 
ज्वारी, नगर, ऊस, पाऊस, हवामान, दूध, शेळीपालन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
jowar fodder has market than jowar
Meta Description: 
jowar fodder has market than jowar
रब्बीत ज्वारीसोबत चाऱ्यासाठी कडबा महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा कडब्याचे चांगले उत्पादन निघाले आहे. मात्र बाजारात ज्वारीपेक्षा कडब्याला अधिक दर आहेत. त्यामुळे ज्वारीपेक्षा यंदा कडबाच अधिक भाव खात असल्याचे दिसत आहे.Source link

Leave a Comment

X