Take a fresh look at your lifestyle.

‘झिरो’ पॉझिटिव्ह मुळे आज कोल्हापूरकरांना दिलासा..!

0


कोल्हापूरगेले काही दिवस सतत कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढत असताना, आज मात्र कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. काल सकाळी १० ते आज रात्री ८ पर्यंत १७६२ प्राप्त अहवालापैकी १६९६ अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे ६६ अहवाल निगेटिव्ह) आले आहेत. आज जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही हा दिलासा आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आज दिलीय.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ३२, भुदरगड- ४९, चंदगड- २५, गडहिंग्लज- १३, गगनबावडा- ६, हातकणंगले- ४, कागल- ११, करवीर- ११, पन्हाळा- २०, राधानगरी- ४८, शाहूवाडी- ११९, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २०, असे एकूण ३७३ आणि पुणे – १,  सोलापूर- १, कर्नाटक- २ आणि आंध्रप्रदेश- १ इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ३७८ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

 • तपासणीकरिता पाठवण्यात आलेले नमुऩे – १९८२१
  • निगेटीव्ह – १७०६५
  • पॉझिटीव्ह – ३७८
  • अहवाल अप्राप्त – २३१३
  • रिपीट – १४
  • रिजेक्ट – ५१
  • बरे झालेले रूग्ण – २०
  • मृत्यु – २
  • शिल्लक रूग्ण – ३५६
  • गंभीर – ४Source link

X