डाळिंबावर फवारलेले कर्जतमधील औषध बनावट

नगर : डाळिंब फळावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासह फळाला चकाकी यावी, यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशक औषधाची कंपनीच अस्तित्वात नाही, असे कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्जत (जि. नगर) तालुक्यात डाळिंब उत्पादकांना बनावट बुरशीनाशक औषध विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तपासणीत संबंधित औषध विक्री करण्यासह अन्य त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. गावडेवाडी (गुरवपिंप्री) येथील प्रकाश गावडे व विनोद गावडे हे आठ-दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेतात.

डाळिंब तोडणीला २० दिवस बाकी असताना फळांवर लाल बिनगी व कुजबा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, फळाला चकाकी यावी यासाठी ‘बायोसोल’ नावाचे बुरशीनाशक फवारले. मात्र फवारणीनंतर आठ दिवसांत सर्व फळांची गळ होऊन नऊ एकरांवरील फळे वाया गेली. २५ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. कर्जतचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के यांच्यासह जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी मिरजगाव (ता. कर्जत) येथे चार दिवसांपूर्वी निविष्ठा विक्री करणाऱ्या पाच कृषी दुकानांवर छापेमारी केली. त्यात तक्रार असलेले औषध आढळून आले नाही. 

बिलाशिवाय खरेदी करू नये. कीटकनाशक, बुरशीनाशक खरेदी करताना संबंधित दुकानदारांकडून मूळ बिल घ्यावे. संशयित कंपनी अस्तित्वात नाही. त्यामुळे संबंधित औषध बोगस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाईबाबत शिफारस केली आहे. 

– पद्मनाथ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

बनावट औषधामुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित औषध कोठून आणले? ते कोण तयार करते? याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– प्रकाश गावडे, शेतकरी, गावडेवाडी, ता. कर्जत, जि. नगर

News Item ID: 
820-news_story-1637240165-awsecm-964
Mobile Device Headline: 
डाळिंबावर फवारलेले कर्जतमधील औषध बनावट
Appearance Status Tags: 
Section News
Sprayed on pomegranate Drug forgery in KarjatSprayed on pomegranate Drug forgery in Karjat
Mobile Body: 

नगर : डाळिंब फळावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासह फळाला चकाकी यावी, यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशक औषधाची कंपनीच अस्तित्वात नाही, असे कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्जत (जि. नगर) तालुक्यात डाळिंब उत्पादकांना बनावट बुरशीनाशक औषध विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तपासणीत संबंधित औषध विक्री करण्यासह अन्य त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. गावडेवाडी (गुरवपिंप्री) येथील प्रकाश गावडे व विनोद गावडे हे आठ-दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेतात.

डाळिंब तोडणीला २० दिवस बाकी असताना फळांवर लाल बिनगी व कुजबा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, फळाला चकाकी यावी यासाठी ‘बायोसोल’ नावाचे बुरशीनाशक फवारले. मात्र फवारणीनंतर आठ दिवसांत सर्व फळांची गळ होऊन नऊ एकरांवरील फळे वाया गेली. २५ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. कर्जतचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के यांच्यासह जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी मिरजगाव (ता. कर्जत) येथे चार दिवसांपूर्वी निविष्ठा विक्री करणाऱ्या पाच कृषी दुकानांवर छापेमारी केली. त्यात तक्रार असलेले औषध आढळून आले नाही. 

बिलाशिवाय खरेदी करू नये. कीटकनाशक, बुरशीनाशक खरेदी करताना संबंधित दुकानदारांकडून मूळ बिल घ्यावे. संशयित कंपनी अस्तित्वात नाही. त्यामुळे संबंधित औषध बोगस असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाईबाबत शिफारस केली आहे. 

– पद्मनाथ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

बनावट औषधामुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित औषध कोठून आणले? ते कोण तयार करते? याचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– प्रकाश गावडे, शेतकरी, गावडेवाडी, ता. कर्जत, जि. नगर

English Headline: 
Agriculture news in marathi, Sprayed on pomegranate Drug forgery in Karjat
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे नगर डाळ डाळिंब कंपनी company कृषी विभाग agriculture department औषध varsha विकास कीटकनाशक
Search Functional Tags: 
पुणे, नगर, डाळ, डाळिंब, कंपनी, Company, कृषी विभाग, Agriculture Department, औषध, Varsha, विकास, कीटकनाशक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sprayed on pomegranate Drug forgery in Karjat
Meta Description: 
Sprayed on pomegranate Drug forgery in Karjat
नगर : डाळिंब फळावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासह फळाला चकाकी यावी, यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशक औषधाची कंपनीच अस्तित्वात नाही, असे कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X