ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालना

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या भागातील मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळेल तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून कंटेनर निर्मितीसह लॉजिस्टिक व्यवसाय वृद्धिंगत होऊन माल वाहतुकीवरचा खर्च कमी होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

हॉटेल सेंटर पॉइंट येथे जेएनपीटी व राष्ट्रीय महामार्ग रसद व्यवस्थापन यांच्यात या संबंधी शुक्रवारी (ता. २२) सामंजस्य करार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार रामदास तडस, वर्धा जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौड, संचालक के. सत्यनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे या वेळी उपस्थित होते.

सिंधी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील ३५ मल्टी मॉडेल पार्कपैकी नागपूर महत्वपूर्ण असून, येथे स्थापन होणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्यात आली असून, त्या सोबत जेएनपीटी काम करणार आहे. त्यामुळे येथून देशभरात‍ निर्यातीवर होणारा वाहतूक खर्च कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या मल्टी मॉडेल पार्कला जोडला आहे. तसेच शीतगृह कंटेनरची या ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे निर्यात योग्य शेतीमाल व फळांची नासाडी होणार नाही. परिणामी, वाहतूक खर्चात बचत होईल.

विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघू उद्योग असो.,चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी यावर परिसंवाद घ्यावा. येथे राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे, असे सांगून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ-सीकॉम यांच्या माध्यमातून सिंधीला स्मार्ट बनवून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबात नियोजन करावे. पूर्व विदर्भात मत्स्य शेतीला वाव असल्यामुळे निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. विदर्भात संत्रा उत्पादकांनाही याचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.

News Item ID: 
820-news_story-1634998610-awsecm-890
Mobile Device Headline: 
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालना
Appearance Status Tags: 
Mukhya News
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालना Dryport boosts orange exportsड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालना Dryport boosts orange exports
Mobile Body: 

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या भागातील मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळेल तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून कंटेनर निर्मितीसह लॉजिस्टिक व्यवसाय वृद्धिंगत होऊन माल वाहतुकीवरचा खर्च कमी होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

हॉटेल सेंटर पॉइंट येथे जेएनपीटी व राष्ट्रीय महामार्ग रसद व्यवस्थापन यांच्यात या संबंधी शुक्रवारी (ता. २२) सामंजस्य करार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार रामदास तडस, वर्धा जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौड, संचालक के. सत्यनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे या वेळी उपस्थित होते.

सिंधी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील ३५ मल्टी मॉडेल पार्कपैकी नागपूर महत्वपूर्ण असून, येथे स्थापन होणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्यात आली असून, त्या सोबत जेएनपीटी काम करणार आहे. त्यामुळे येथून देशभरात‍ निर्यातीवर होणारा वाहतूक खर्च कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या मल्टी मॉडेल पार्कला जोडला आहे. तसेच शीतगृह कंटेनरची या ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे निर्यात योग्य शेतीमाल व फळांची नासाडी होणार नाही. परिणामी, वाहतूक खर्चात बचत होईल.

विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघू उद्योग असो.,चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी यावर परिसंवाद घ्यावा. येथे राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे, असे सांगून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ-सीकॉम यांच्या माध्यमातून सिंधीला स्मार्ट बनवून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबात नियोजन करावे. पूर्व विदर्भात मत्स्य शेतीला वाव असल्यामुळे निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. विदर्भात संत्रा उत्पादकांनाही याचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.

English Headline: 
Agriculture News in Marathi Dryport boosts orange exports
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रेल्वे रोजगार employment नागपूर nagpur व्यवसाय profession नितीन गडकरी nitin gadkari हॉटेल महामार्ग सुनील केदार खासदार मंत्रालय विभाग sections समृद्धी महामार्ग हैदराबाद शेती farming नासा विदर्भ vidarbha व्यापार संघटना unions महाराष्ट्र maharashtra गुंतवणूक मत्स्य पुढाकार initiatives
Search Functional Tags: 
रेल्वे, रोजगार, Employment, नागपूर, Nagpur, व्यवसाय, Profession, नितीन गडकरी, Nitin Gadkari, हॉटेल, महामार्ग, सुनील केदार, खासदार, मंत्रालय, विभाग, Sections, समृद्धी महामार्ग, हैदराबाद, शेती, farming, नासा, विदर्भ, Vidarbha, व्यापार, संघटना, Unions, महाराष्ट्र, Maharashtra, गुंतवणूक, मत्स्य, पुढाकार, Initiatives
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Dryport boosts orange exports
Meta Description: 
Dryport boosts orange exports
वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X