ड्रॅगनच्या विळख्यातला ‘टोनले साप’

एखादं भक्ष्य खाऊन फुगलेल्या सापाप्रमाणं दिसणारं ‘टोनले साप’ तळं कंबोडियातील महत्त्वाचा निसर्गाविष्कार आहे. कंबोडियाचं धडधडणारं निळं हृदय आहे. त्याच्याशी जोडलेली मेकाँक नदी तिबेटच्या पठारावर उगम होऊन ही नदी चीन, ब्रह्मदेश, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधून वाहत जाते. त्यावर चीनने मोठमोठी धरणं बांधून प्रवाहावर नियंत्रण स्थापन केलं आहे.

भारताशी सांस्कृतिक भावकी असणाऱ्या देशात बाइकने फिरतोय. थायलंड आणि व्हिएतनाम अशा दोन दमदार अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गरीब कंबोडियाचं सॅण्डविच झालंय. पण निसर्गाने या देशाला भरभरून दिलंय. अमेरिकेबरोबरच्या युद्धात हे सौंदर्य ओरबाडायचा प्रयत्न केला खरा. ती जखम जवळ जवळ भरून निघालीय. पुढे चालत राहणं हे निसर्गाकडून शिकावं. इथला निसर्ग परत सावरलाय. इथला असाच एक महत्त्वाचा निसर्गाविष्कार आहे म्हणजे ‘टोनले-साप’. गोंधळू नका, हा काही फणाधारी साप नाहीये. ‘टोनले-साप’ हे कंबोडियातील एक प्रसिद्ध तळं आहे. हे काही साधंसुधं तळं नाहीये. ते निसर्गाचा आविष्कार आणि कंबोडियाची जीवनरेखा आहे.

‘टोनले-साप’चा अर्थ, ‘ताजी नदी’ किंवा दुसऱ्या अर्थाने ‘महान तळं’ असा होतो. या तळ्याचं पाणलोट क्षेत्र आहे तब्ब्ल ८० हजार वर्ग किलोमीटर. सोप्या भाषेत सांगायचं तर अख्ख्या कंबोडियाच्या जमिनीच्या ४४ टक्के जमीन टोनले-सापच्या पाणलोटात येते. यावरूनच त्याच्या अवाढव्य आकाराची कल्पना येईल. कोरड्या हंगामात या तळ्याची खोली एक मीटर, तर आकार २५०० ते ३००० किलोमीटर असतो. ओल्या हंगामात खोली दहा मीटर एवढी असते. पावसाळ्यात ते रक्त पिऊन टम्म फुगलेल्या जळूगत फुगतं. आजूबाजूच्या जंगलातून आलेल्या पावसाने त्याचा फुगवटा चारपाच पटीने वाढतो. ‘टोनले’चा हा ‘साप’ १० हजार ते १६ हजार वर्गकिलोमीटर एवढा मोठा होतो.

हे तळं म्हणजे कंबोडियाचं धडधडणारं हृदय आहे. त्यातील पाण्याची पातळी सतत कमीजास्त होत असते. म्हणजे उन्हाळ्यात टोनले-साप नदी तळ्यातील पाणी मेकाँक नदीत वाहून नेते. तळ्याच्या पाण्याचा विस्तार दोन अडीच हजार किलोमीटर एवढा आकसतो. पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडून झाडी वाढते. इथं पावसाचं प्रमाण अधिक आहे. डोंगरदऱ्यात कोसळलेला पाऊस, लाखो लिटर पाणी मेकाँक नदीत आणून सोडतो. मेकाँक नदीला पूर येतो. टोनले-साप तळं कंबोडियाची जीवनदायिनी मेकाँक नदीशी टोनले-साप नावाच्या नदीने जोडले गेलंय. मेकॉंक नदी पुढं दक्षिण चिनी समुद्राला मिळते. मेकाँक नदीच्या पुरामुळे टोनले साप नदीच्या पाण्यावर दाब तयार होतो. मेकाँकचं पाणी उलटं टोनले-साप नदीमधून टोनले-साप तळ्यातही येतं. त्यामुळे तळ्याचा आकार पाचपटीने फुगून दहा ते सोळा हजार वर्ग किलोमीटर एवढा होतो. इतके दिवस दर्शन देणारी, उन्हात तापलेली जमीन आणि झाडी काही महिन्यासाठी पाण्याखाली जाते. तळ्याची ही आकुंचन प्रसरण प्रक्रिया हृदयाच्या धडधडीसारखी दरवर्षी सुरू असते. गेली हजारो वर्षे कंबोडियाचं हे निळं हृदय अविरत धडधडतंय.

या तळ्याच्या आश्रयाने अद्वितीय जैवविविधता फुललेली आहे. पाण्याच्या फुगवट्यात तयार झालेल्या जंगलात २२५ प्रकारच्या वनस्पती आढळतात. ४६ प्रकारचे सस्तन प्राणी, २२५ प्रकारचे पक्षी, ४२ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि २९६ प्रकारचे वेगवेगळे मासे इथं सापडतात. या तळ्याच्या लाभक्षेत्रात १२ लाख लोक (एकूण लोकसंख्येपैकी ३२ टक्के लोक) राहतात. तळ्याच्या काठावर वसलेली हजारो गावं आणि लोकांची दिनचर्या तळ्याशी एकरूप झालीय. टोनले-साप नदी आणि मेकाँक नदीच्या संगमावर नववर्षाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा होतो. या कंबोडियन जलोत्सवानिमित्ताने सुमारे दहा लाख लोकांची तळ्यावर झुंबड उडते.

जगातला संपन्न असा मासेमारी व्यवसाय इथं आहे. ७० टक्के कंबोडियन लोकांच्या प्रोटीनची गरज माशांद्वारे भागवली जाते. या लोकांचे माशांशी गहिरं नातं आहे. कदाचित कंबोडियन चलनाचं ‘रियाल’ हे नाव इथल्या माशांवरून घेतलं गेलंय. मेकाँक नदीचा हा पट्टा जगातला सर्वांत जास्त मत्स्य उत्पादक पट्ट्यांपैकी आहे. दरवर्षी २० लाख टन मासेमारी इथून होते. ॲमेझॉन, काँगो, यांगत्से आणि मिसिसिपीपेक्षाही जास्त मासे इथं पकडले जातात. पाण्याचा असामान्य चढउतारामुळे इथलं माशांचं उत्पादन जास्त आहे असं म्हणतात. मेकाँक नदीतून उलट्या दाबाने येणारं पाणी माशांसाठी वरदान ठरतं. या स्थलांतरित पाण्यासोबत वाढलेल्या अन्नद्रव्यांमुळे माशांचं उत्पादनही वाढतं.

जंगलतोड, लोकसंख्या वाढ, प्रदूषण, नदीकाठचे औद्योगिक प्रकल्प यामुळे माशांची संख्या घटलीय. पूर्वीसारखे मासे आताशा मिळत नाहीत, अशी इथल्या लोकांची तक्रार आहे. मासे पकडायला भलंमोठं औद्योगिक जाळं लावलं जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे पकडले जातात. पूर्वी जे लहान मासे सोडून द्यायचे, तेही आता पकडले जाताहेत. परिणामी, तळ्यात म्हणावं तेवढं माशांचं बीज उरत नाही. म्हणून माशांची पैदास कमी होते. अशा दुष्टचक्रात ‘टोनले-साप’ अडकलंय. त्यातच चीनने धरणांचा नळ बंद करून मेकाँक नदीच्या पाण्यावर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे टोनले-साप तळ्यातील पाण्याची पातळी कमी होतेय. इथल्या माशांची पैदास खालावलीय, इथली जैवविविधता धोक्यात आलीय. चिनी ड्रॅगनच्या विषारी विळख्यात ‘टोनले’चा हा ‘साप’ अडकलाय.

चिनी ग्रहण…
कंबोडियातील या प्रोटीनच्या स्रोताला सध्या चिनी ग्रहण लागलंय. मेकाँक नदी ही जगातली १२ वी सर्वांत मोठी नदी आहे. तिला आग्नेय आशियातील ‘ॲमेझॉन’ असंही म्हणतात. तिबेटच्या पठारावर उगम होऊन ही नदी चीन, ब्रह्मदेश, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधून वाहत जाते. या देशांना मासे, शेतीसाठी आणि प्यायला पाणी पुरवत ती दक्षिण चीन समुद्रात स्वतःला झोकून देते. या सर्व देशांची अर्थव्यवस्था मेकाँक नदीवर अवलंबून आहे.

१९९० नंतर चीनने मेकाँक नदीचं पाणी अडवायचा शातीर प्लॅन बनवला. त्यांनी डझनावारी, मोठाली धरणं या नदीवर बांधली. वर्षातून काही वेळा चीन धरणाचा विसर्ग मुद्दाम कमी करतो आणि जास्त पाणी अडवतो. त्यामुळे थायलंड, कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाममध्ये दुष्काळाची स्थिती तयार होते. मेकाँक नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊन शेती, मासेमारीला मोठी झळ बसते. मग आशियान संघटनेच्या माध्यमातून चीनवर दबाव आणायचा प्रयत्न केला गेला. पण दबावात येईल तो चीन कसला! उलट चलाख चीनने या देशांना वेगळाच प्लॅन सांगितला. ‘जशी आम्ही धरणं बांधली, तशीच धरणं तुमच्या देशातही बांधा, म्हणजे तुमचा पाण्याचा साठा तुम्ही वर्षभर धरून ठेवू शकाल’. यासाठी पैसे कुठून येतील? हा प्रश्‍न विचारल्यावर, ‘आम्ही आहोत ना’, असं म्हणत, चीनतर्फे या प्रकल्पासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावानुसार चीनने या देशांमध्ये मेकाँक नदीवर २२७ धरणं बांधायचा घाट घातला. तब्ब्ल चौदा लाख कोटी रुपये खर्चून हा महाकाय धरण प्रकल्प चीन राबवणार. ही धरणं चीनच्या बांधकाम कंपन्या, चिनी कामगार आणि चिनी पैशाने बांधली जाणार. म्हणजे चिनी बांधकाम कंपन्या, चिनी कामगारांमार्फत धरणांसाठी या देशांना दिलेला कर्जाऊ पैसा पुन्हा चीनमध्ये परत येणार. या कर्ज आणि त्यावरचं व्याज मात्र धरणाची गरज नसणाऱ्या या अन्य देशांना भरावं लागणार. थोडक्यात, काय तर हे देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात अडकणार. आपला एक शेजारी अशाच चिनी कर्जाच्या विळख्यात अडकूनही हिरव्या मस्तीत वावरतोय.

News Item ID: 
820-news_story-1634905663-awsecm-428
Mobile Device Headline: 
ड्रॅगनच्या विळख्यातला ‘टोनले साप’
Appearance Status Tags: 
Section News
 ‘टोनले साप’ तळ्यांच्या परिसरात अनेक तरंगती शहरे वसलेली आहेत ‘टोनले साप’ तळ्यांच्या परिसरात अनेक तरंगती शहरे वसलेली आहेत
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi article by Dr. satilal patil
Author Type: 
External Author
डॉ. सतीलाल पाटील
साप snake निसर्ग हृदय कंबोडिया धरण भारत थायलंड व्हिएतनाम सौंदर्य beauty मात mate ऊस पूर floods यिन yin समुद्र जैवविविधता वर्षा varsha मासेमारी व्यवसाय profession मत्स्य स्थलांतर प्रदूषण शेती farming चीन लाओस कर्ज व्याज
Search Functional Tags: 
साप, Snake, निसर्ग, हृदय, कंबोडिया, धरण, भारत, थायलंड, व्हिएतनाम, सौंदर्य, beauty, मात, mate, ऊस, पूर, Floods, यिन, YIN, समुद्र, जैवविविधता, वर्षा, Varsha, मासेमारी, व्यवसाय, Profession, मत्स्य, स्थलांतर, प्रदूषण, शेती, farming, चीन, लाओस, कर्ज, व्याज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article by Dr. satilal patil
Meta Description: 
article by Dr. satilal patil
एखादं भक्ष्य खाऊन फुगलेल्या सापाप्रमाणं दिसणारं ‘टोनले साप’ तळं कंबोडियातील महत्त्वाचा निसर्गाविष्कार आहे. कंबोडियाचं धडधडणारं निळं हृदय आहे. त्याच्याशी जोडलेली मेकाँक नदी तिबेटच्या पठारावर उगम होऊन ही नदी चीन, ब्रह्मदेश, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधून वाहत जाते. त्यावर चीनने मोठमोठी धरणं बांधून प्रवाहावर नियंत्रण स्थापन केलं आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X