‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न भरल्याने कारवाई 

नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी भरण्याची नोटीस बजावूनही वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकी वसुलीसाठीचा फंडा वापरला, मात्र तो फंडा तसाच त्यांच्‍यावर उलटला.

महसूल विभागाची विविध करांची लाखोंची थकबाकी वीज वितरण कंपनीकडे थकीत आहे. ती भरली नाही म्हणून थेट तहसीलदार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फौजफाट्यासह पोचले. त्यांनीही थकीत रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकून जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे ‘तू शेर तर मी सव्वाशेर’ अशा प्रकारचा कलगीतुरा या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगला आहे. दरम्यान, हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात व तेथून वरिष्ठ अधिकारी आणि आता समझोत्यासाठी थेट जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्‍या कोर्टात पोहोचले आहे. उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नव्हता. दोन्ही विभागांकडून खलबते सुरू होती. 

सध्या वीज वितरण कंपनीने थकीत बिलाच्या रक्कम वसुलीसाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. थकबाकी न भरणाऱ्या वीजग्राहकांवर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयास थकीत वीजबिलाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले होते. तसे पत्रही देण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या म्हणण्यानुसार थकीत बिलाची रक्कम भरण्यासाठी कोशागार विभागाकडे प्रक्रिया सुरू झाली होती. तेथे दोन दिवस उशीर झाला. त्यामुळे वीजबिल भरले गेले नाही. त्यामुळे महसूल विभागाने वीज वितरण कंपनीला पुन्हा दोन दिवसांची संधी मागितली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन जात तहसील कार्यालयाची वीज तोडली. त्यामुळे तहसील कार्यालय अंधारात बुडाले. तहसील कार्यालयातील कामे विजेअभावी ठप्प झाली. 

हे प्रकरण तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे गेले. त्यांनीही शेवटी वीज वितरण कंपनी जर त्यांच्या थकीत रकमेसाठी वीज खंडित करत असेल तर आपल्या विभागाचीही सुमारे सात लाखांची महसुलाची रक्कम थकीत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी थेट तहसीलदार सकाळी दहाच्या सुमारास वीज वितरण कार्यालयात आपला फौजफाटा घेऊन गेले.

News Item ID: 
820-news_story-1638281630-awsecm-267
Mobile Device Headline: 
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न भरल्याने कारवाई 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Power outage in 'tehsil'; Action for non-payment of arrearsPower outage in 'tehsil'; Action for non-payment of arrears
Mobile Body: 

नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी भरण्याची नोटीस बजावूनही वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकी वसुलीसाठीचा फंडा वापरला, मात्र तो फंडा तसाच त्यांच्‍यावर उलटला.

महसूल विभागाची विविध करांची लाखोंची थकबाकी वीज वितरण कंपनीकडे थकीत आहे. ती भरली नाही म्हणून थेट तहसीलदार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फौजफाट्यासह पोचले. त्यांनीही थकीत रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकून जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे ‘तू शेर तर मी सव्वाशेर’ अशा प्रकारचा कलगीतुरा या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगला आहे. दरम्यान, हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात व तेथून वरिष्ठ अधिकारी आणि आता समझोत्यासाठी थेट जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्‍या कोर्टात पोहोचले आहे. उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नव्हता. दोन्ही विभागांकडून खलबते सुरू होती. 

सध्या वीज वितरण कंपनीने थकीत बिलाच्या रक्कम वसुलीसाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. थकबाकी न भरणाऱ्या वीजग्राहकांवर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयास थकीत वीजबिलाची रक्कम त्वरित भरण्यास सांगितले होते. तसे पत्रही देण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या म्हणण्यानुसार थकीत बिलाची रक्कम भरण्यासाठी कोशागार विभागाकडे प्रक्रिया सुरू झाली होती. तेथे दोन दिवस उशीर झाला. त्यामुळे वीजबिल भरले गेले नाही. त्यामुळे महसूल विभागाने वीज वितरण कंपनीला पुन्हा दोन दिवसांची संधी मागितली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन जात तहसील कार्यालयाची वीज तोडली. त्यामुळे तहसील कार्यालय अंधारात बुडाले. तहसील कार्यालयातील कामे विजेअभावी ठप्प झाली. 

हे प्रकरण तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे गेले. त्यांनीही शेवटी वीज वितरण कंपनी जर त्यांच्या थकीत रकमेसाठी वीज खंडित करत असेल तर आपल्या विभागाचीही सुमारे सात लाखांची महसुलाची रक्कम थकीत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी थेट तहसीलदार सकाळी दहाच्या सुमारास वीज वितरण कार्यालयात आपला फौजफाटा घेऊन गेले.

English Headline: 
Agriculture News in Marathi Power outage in ‘tehsil’; Action for non-payment of arrears
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
वीज कंपनी company नंदुरबार nandurbar महसूल विभाग revenue department विभाग sections तहसीलदार पोलिस महावितरण ऊस सकाळ
Search Functional Tags: 
वीज, कंपनी, Company, नंदुरबार, Nandurbar, महसूल विभाग, Revenue Department, विभाग, Sections, तहसीलदार, पोलिस, महावितरण, ऊस, सकाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Power outage in ‘tehsil’; Action for non-payment of arrears
Meta Description: 
Power outage in ‘tehsil’;
Action for non-payment of arrears
थकबाकी भरण्याची नोटीस बजावूनही वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करून थकबाकी वसुलीसाठीचा फंडा वापरला, मात्र तो फंडा तसाच त्यांच्‍यावर उलटला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment