[ad_1]
पुणे : ‘‘शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच चांगला फायदा होईल,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
कृषी विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदूळ महोत्सवाला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भेट दिली. महोत्सवातील प्रत्येक स्टॉलधारक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून ग्राहक होऊन तांदूळ तसेच विविध शेती उत्पादनाची खरेदी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी तांदूळ महोत्सवाबाबत माहिती दिली.
कृषी विभागाच्या आवारात भरलेल्या महोत्सवाला भेट देत शेतकऱ्यांकडून शेती उत्पादनाची खरेदी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनाला मिळणारी बाजारपेठ आदी विषयांसह पुणे महानगरात शेतकरी ते ग्राहक थेट कायमस्वरूपी बाजारपेठ उभारण्याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पुणे जिल्ह्यातील कृषी व आत्मा विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पुण्यात तांदूळ महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना बाजारपेठ देण्याचा चांगला प्रयत्न आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीव्यवस्था कृषी विभागाच्या आवारात कायमस्वरूपी उभी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. तांदूळ महोत्सवातील स्टॉलमध्ये सेंद्रिय शेती, पर्यावरण प्रेमी, आरोग्य, तसेच नवीन गरजेप्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादने विक्रीसाठी आणली ही चांगली सुरूवात आहे. आजच्या स्टॉलधारक शेतकऱ्यांची एकत्रित वेबसाइटवर नोंदणी केली तर ग्राहकांना खरेदीही सुलभ होईल. तांदूळ महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचे महत्त्वाचे पाऊल पडत आहे.’’

[ad_2]
Source link