ताई मानलं तुला…!! ताईंनी नोकरीला राम दिला, सुरु केली मशरूम शेती, कमवतेय वार्षिक 1 करोड - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

ताई मानलं तुला…!! ताईंनी नोकरीला राम दिला, सुरु केली मशरूम शेती, कमवतेय वार्षिक 1 करोड

0
Rate this post

[ad_1]

Successful Farmer: एकीकडे देशातील तरुण रोजगाराच्या शोधात महानगरांकडे तसेच विदेश वारीकडे वळत आहेत, त्यामुळे राज्यातील खेड्यापाड्यांतून स्थलांतर होत असून अनेक गावांचे रूपांतर विरानात झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातून होत असलेलं स्थलांतर एक चिंतेची बाब बनत चालली आहे.

मात्र असे असले तरी आजच्या युगात देखील असे अनेक नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असून सुद्धा खेड्यात राहतात आणि शेतीत क्रांती घडवून आणत आहेत. उत्तराखंडमध्ये देखील या युगात एक मुलगी मेट्रो शहराची नोकरी सोडून शेती (Farming) करून लाखोंची कमाई (Farmer Income) करत आहे.

उत्तराखंड मधील एक मुलगी नोकरीं सोडून आता मशरूमची लागवड (Mushroom Farming) करत आहे. तिला संपूर्ण उत्तराखंडमध्ये ‘मशरूम गर्ल ऑफ डेहराडून’ मम्हणून ओळखले जाते. मित्रांनो आम्ही ज्या मुलीबद्दल बोलत आहोत ती आहे मशरूम गर्ल दिव्या रावत.

आज आपण मशरूम गर्ल दिव्या रावतची गोष्ट जाणून घेणार आहोत. या मुलीने केवळ स्वत:साठी रोजगाराचे उड्डाण घेतले नाही तर डोंगरावरील बेरोजगार तरुण आणि महिलांना आशेचे पंखही दिले आहेत.

मशरूम गर्ल म्हणजेच दिव्या रावतने सांगितले की, तिचा जन्म उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात झाला आहे. डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर दिव्या पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली, तेथून तिने ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर सामाजिक कार्यात काम करायला सुरुवात केली.

दिव्याला समजले की, आपण तरुण आणि महिलांसाठी काहीतरी केले पाहिजे, म्हणून ती नोकरी सोडून उत्तराखंडला परत आली आणि नंतर अनेक राज्यांमध्ये आणि परदेशात जाऊन मशरूम शेती शिकली. मशरूम लागवडीचे तंत्र शिकून दिव्या रावत उत्तराखंडला परतल्या आणि मग तिने गावोगावी जाऊन महिला आणि तरुणांना मशरूम लागवड शिकवायला सुरुवात केली.

सध्या दिव्या रावत या सौम्या फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालक आहेत, ज्यांची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटी रुपये आहे. यासोबतच शेकडो महिलांना यात रोजगारही मिळाला आहे. दिव्या रावतने ‘मॅशमॅश’ नावाचे रेस्टॉरंटही सुरू केले आहे, ज्यामध्ये मशरूमची स्वादिष्ट डिश लोकांना उपलब्ध करून दिली जात आहे.

जर तुम्ही डेहराडूनला आलात आणि मशरूम गर्ल दिव्या रावतच्या मशरूम रेस्टॉरंटच्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर हे रेस्टॉरंट राजपूर रोडवर, सचिवालयासमोर आहे. येथे तुम्हाला तंदूरी मशरूम, चिली मशरूम, मशरूम टिक्का, मशरूम नूडल्स असे अनेक स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतील. निश्चितच दिव्या रावत या ताईंनी शेतीत मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांना (Farmer) प्रेरणा देणारे आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link