‘ताकारी’चे पाहिले आवर्तन बंद ः डवरी

सांगली ः  ताकारी योजनेच्या लाभक्षेत्राची पाण्याची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारेने ७ ऑक्टोबरला पाणी सुरू केले होते. या पाण्याने सुमारे १२३ कि.मी. पर्यंत सिंचनक्षेत्राला दिलासा मिळाला. योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तनही वेळेत सुरू होईल, असा विश्वास कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिला.

यावर्षी मॉन्सूनसह परतीच्या पावसाने पूर्णतः दडी मारली. त्यामुळे सर्वत्र पिकांची होरपळ होत होती. जमिनीतील पाणीपातळी प्रचंड खालावली होती. या पार्श्वभूमीवर ताकारी योजनेचे पाणी सुरू करून खरिपांसह बारमाही पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी वांगीसह ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची होती. यास अनुसरून पाटबंधारेने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुरू केले होते.

यंदा घाटमाथ्यावर अगदीच कमी पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पाणीसाठा झालाच नाही. मात्र लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. त्यामुळे सप्टेंबरपूर्वीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. नियमित बारमाही पिकांसह खरिपासाठी जमिनीतून भरमसाट पाणीउपसा झाला. त्यामुळे ओढे व नाले आटले. पाण्याचा खडखडाट होऊन पिकांचे अपरिमित नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. 

लाभक्षेत्राची व्यथा जाणून पाटबंधारेने ७ ऑक्टोबरला सुरू केलेले पाणी मुख्य कालव्याच्या १२३ कि.मी.वर वंजारवाडी (ता. तासगाव) पर्यंत पोहोचल्यानंतर एका महिन्यानंतर योजना बंद करण्यात आली. ताकारीच्या माध्यमातून सोडलेल्या पाण्याचा उपयोग किमान पुढील महिनाभर शेतीसाठी तसेच काही गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होईल. शेतकऱ्यांनी गरजेनुसार पाणी वापरून सिंचनक्षेत्र वाढवावे. या पुढील पाणीही वेळेत सुरू होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

News Item ID: 
820-news_story-1636375370-awsecm-701
Mobile Device Headline: 
‘ताकारी’चे पाहिले आवर्तन बंद ः डवरी
Appearance Status Tags: 
Section News
Takari's first rotation off: DavariTakari's first rotation off: Davari
Mobile Body: 

सांगली ः  ताकारी योजनेच्या लाभक्षेत्राची पाण्याची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारेने ७ ऑक्टोबरला पाणी सुरू केले होते. या पाण्याने सुमारे १२३ कि.मी. पर्यंत सिंचनक्षेत्राला दिलासा मिळाला. योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तनही वेळेत सुरू होईल, असा विश्वास कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिला.

यावर्षी मॉन्सूनसह परतीच्या पावसाने पूर्णतः दडी मारली. त्यामुळे सर्वत्र पिकांची होरपळ होत होती. जमिनीतील पाणीपातळी प्रचंड खालावली होती. या पार्श्वभूमीवर ताकारी योजनेचे पाणी सुरू करून खरिपांसह बारमाही पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी वांगीसह ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची होती. यास अनुसरून पाटबंधारेने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुरू केले होते.

यंदा घाटमाथ्यावर अगदीच कमी पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत पाणीसाठा झालाच नाही. मात्र लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी जमिनीतून प्रचंड पाणीउपसा होत आहे. त्यामुळे सप्टेंबरपूर्वीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. नियमित बारमाही पिकांसह खरिपासाठी जमिनीतून भरमसाट पाणीउपसा झाला. त्यामुळे ओढे व नाले आटले. पाण्याचा खडखडाट होऊन पिकांचे अपरिमित नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. 

लाभक्षेत्राची व्यथा जाणून पाटबंधारेने ७ ऑक्टोबरला सुरू केलेले पाणी मुख्य कालव्याच्या १२३ कि.मी.वर वंजारवाडी (ता. तासगाव) पर्यंत पोहोचल्यानंतर एका महिन्यानंतर योजना बंद करण्यात आली. ताकारीच्या माध्यमातून सोडलेल्या पाण्याचा उपयोग किमान पुढील महिनाभर शेतीसाठी तसेच काही गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होईल. शेतकऱ्यांनी गरजेनुसार पाणी वापरून सिंचनक्षेत्र वाढवावे. या पुढील पाणीही वेळेत सुरू होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

English Headline: 
Agriculture news in marathi, Takari’s first rotation off: Davari
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पाणी water ऊस पाऊस तासगाव शेती farming
Search Functional Tags: 
पाणी, Water, ऊस, पाऊस, तासगाव, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Takari’s first rotation off: Davari
Meta Description: 
Takari’s first rotation off: Davari
सांगली ः  ताकारी योजनेच्या लाभक्षेत्राची पाण्याची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारेने ७ ऑक्टोबरला पाणी सुरू केले होते. या पाण्याने सुमारे १२३ कि.मी. पर्यंत सिंचनक्षेत्राला दिलासा मिळाला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X