तिलारीचा कालवा पुन्हा मणेरी येथे फुटला

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिलारी धरणाचे कालवे फुटण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात दोन्ही राज्यांतील अनेक गावे येतात. परंतु या धरणाचे कालवे सातत्याने फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्याकडे जाणारा कालवा फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या शिवाय काही दिवस पाणीदेखील बंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी उपकालवा मणेरी येथे फुटला. या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. नव्याने पेरणी केलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उपअभियंता एस. डी. अंबी, एस .एस. सिंघवी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कालव्याचे काम करीत असलेले ठेकेदार धनंजय पाटील यांना संपर्क साधून तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना केल्या. या कालव्याच्या सद्यःस्थितीची माहिती काही दिवसांपूर्वीच शेतकरी अजय कुबल यांनी अधिकाऱ्यांना दिली. धोका ओळखून दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
 
News Item ID: 
820-news_story-1642078120-awsecm-225
Mobile Device Headline: 
तिलारीचा कालवा पुन्हा मणेरी येथे फुटला
Appearance Status Tags: 
Section News
 The Tilari canal burst again at Maneri
Mobile Body: 

सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिलारी धरणाचे कालवे फुटण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात दोन्ही राज्यांतील अनेक गावे येतात. परंतु या धरणाचे कालवे सातत्याने फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्याकडे जाणारा कालवा फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या शिवाय काही दिवस पाणीदेखील बंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी उपकालवा मणेरी येथे फुटला. या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. नव्याने पेरणी केलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उपअभियंता एस. डी. अंबी, एस .एस. सिंघवी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कालव्याचे काम करीत असलेले ठेकेदार धनंजय पाटील यांना संपर्क साधून तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना केल्या. या कालव्याच्या सद्यःस्थितीची माहिती काही दिवसांपूर्वीच शेतकरी अजय कुबल यांनी अधिकाऱ्यांना दिली. धोका ओळखून दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
 
English Headline: 
Agriculture news in marathi, The Tilari canal burst again at Maneri
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
धरण पाणी water शेती farming महाराष्ट्र maharashtra घटना incidents
Search Functional Tags: 
धरण, पाणी, Water, शेती, farming, महाराष्ट्र, Maharashtra, घटना, Incidents
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The Tilari canal burst again at Maneri
Meta Description: 
The Tilari canal burst again at Maneri
सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment