तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधार

पुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक सुरू होईल… यंदा तुरीच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे विविध भागांतील शेतकऱ्यांनी सांगितले मात्र मोठी आयात आणि नुकत्याच संपलेल्या साठामर्यादेमुळे दर दबावात होते. सध्या बाजारात तुरीला ५९०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तूर उत्पादकांना चांगला दर मिळावा असे वाटत असेल, तर केंद्राने साठा मर्यादा लावू नये आणि हमीभावाने खरेदीला मान्यता द्यावी, अशी मागणी होत आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने तुरीच्या पिकाला काही प्रमाणात फटका बसला. मात्र उत्पादनात किती घट येईल हे आताच सांगणे घाईचे ठरेल. पुढच्या महिन्यापासून बाजारात तुरीची आवक वाढेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाला फटका बसला, तरी सध्या मालाची गुणवत्ता टिकून आहे. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाने देशातील तूर उत्पादक पट्ट्यांत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी काहीसे चिंतेत आहेत. 

पुढील महिन्यापासून बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यापासून तुरीच्या आवकेत मोठी वाढ होईल. त्यामुळे उपलब्ध वाढणार आहे. तुरीची आवक सुरू झाल्यानंतर पुरवठा वाढून दरावर दबाव येण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी आणि स्टॉकिस्ट साठ्यातील माल बाजारात आणत आहेत… 

देशातील पीक हातात येण्याच्या काळात आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. या आयात केलेल्या तुरीमुळेच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असूनही तुरीसह इतर डाळींचे दरबावात आहेत. परिणामी, कडधान्याचे दरही हमीभावाच्या आसपास आहेत. तुरीच्या डाळीचा व्यापारही सुस्त पडलेला दिसतोय… आफ्रिकेतील देशांतून तुरीची आयात वाढल्याने बंदरांवर साठा वाढताना दिसतोय… तर नवीन वर्षात म्यानमारमधून तुरीची आयात वाढण्याची भीती व्यापारी सूत्रांनी व्यक्त केलीय… 

हमीभावाने खरेदी आवश्यक
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे बाजारात कडधान्य दर दबावात असतानाच नवीन हंगामातील तूर बाजारात येतेय. त्यातच आयात माल मोठ्या प्रमाणात असल्याने दर हमीभाव किंवा हमीभावाच्याही खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमीभावाने खरेदी करणे गरजेचे आहे. यंदा केंद्र सरकारने तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला आहे. गेल्या हंगामात तुरीचे दर हमीभावाच्या दरम्यान राहिले. परंतु यंदा केंद्राने मुक्त आयात, साठा मर्यादा लावल्याने दर दबावात आहेत. त्यामुळे यंदा तुरीला हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे. 

तूर पिकाचे १५ ते २० टकक्के नुकसान झाल्याचे विविध भागांतून रिपोर्ट येत आहेत. सध्या बाजारात तुरीला ६१०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नवीन हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर द्यायचा असेल, तर केंद्राने पुन्हा साठामर्यादा लावू नये. सध्या बाजारात तुरीची डाळ ९० ते ९५ रुपये किलो मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तूंच्या तुलनेत अन्नधान्य आणि डाळींचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे सरकारने साठा मर्यादा लावू नये, अन्यथा व्यापारी कमी खरेदी करतील आणि दर पुन्हा दबावात येतील.
– अशोक अगरवाल, तूर व्यापारी, लातूर

News Item ID: 
820-news_story-1635913095-awsecm-273
Mobile Device Headline: 
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधार
Appearance Status Tags: 
Tajya News
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारतुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधार
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Tur needs Government MSP repurchase support
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
पुणे तूर हमीभाव minimum support price महाराष्ट्र maharashtra कर्नाटक हवामान शेतकरी व्यापार दिवाळी डाळ कडधान्य वर्षा varsha डिझेल लातूर latur
Search Functional Tags: 
पुणे, तूर, हमीभाव, Minimum Support Price, महाराष्ट्र, Maharashtra, कर्नाटक, हवामान, शेतकरी, व्यापार, दिवाळी, डाळ, कडधान्य, वर्षा, Varsha, डिझेल, लातूर, Latur
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tur needs Government MSP repurchase support
Meta Description: 
Tur needs Government MSP repurchase support
मोठी आयात आणि नुकत्याच संपलेल्या साठामर्यादेमुळे दर दबावात होते. सध्या बाजारात तुरीला ५९०० ते ६२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X