तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जा

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विकास सोसायट्या, शेतकरी महिला गटांनी पुढाकार घेऊन छोटे प्रकल्प उभारल्यास खाद्यतेलात खेडी स्वयंपूर्ण होण्यास मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर म्हणाले, की गुजरातहून तेलबियांच्या गाळपाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची मशिन कृषी महाविद्यालयाने खरेदी केलेली आहे. आठ तासांत सुमारे पन्नास किलो तेलबियांचे गाळप करण्याची क्षमता असलेले हे मशिन आहे. खाद्यतेलांच्या खरेदीमध्ये भेसळ नसलेल्या शुद्ध तेलाचा आग्रह ग्राहकांचा राहतो. त्यामुळे शेतकरी, ग्राहकांनी स्वतःच तेलबिया या ठिकाणी आणून समक्ष खाद्यतेल घेऊन जाण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. विकतचे खाद्यतेल खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या तेलबिया गाळपातून तेलाची उपलब्धता वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा छोटासा प्रकल्प आहे.

कोणत्या तेलबियांचे होणार गाळप
शुद्ध खाद्यतेलांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, मोहरी आदी तेलबियांचे गाळप या ठिकाणी होईल. ग्राहकांना तेलबियांच्या गाळपातून खाद्यतेल आणि पेंड घेऊन गेल्यास प्रति किलो तीस रुपये शुल्क आकारणी होईल. तर केवळ तयार खाद्यतेल नेल्यास १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अर्थशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी दिली.
 
News Item ID: 
820-news_story-1635082963-awsecm-257
Mobile Device Headline: 
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Bring oilseeds and edible oilBring oilseeds and edible oil
Mobile Body: 

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विकास सोसायट्या, शेतकरी महिला गटांनी पुढाकार घेऊन छोटे प्रकल्प उभारल्यास खाद्यतेलात खेडी स्वयंपूर्ण होण्यास मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर म्हणाले, की गुजरातहून तेलबियांच्या गाळपाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची मशिन कृषी महाविद्यालयाने खरेदी केलेली आहे. आठ तासांत सुमारे पन्नास किलो तेलबियांचे गाळप करण्याची क्षमता असलेले हे मशिन आहे. खाद्यतेलांच्या खरेदीमध्ये भेसळ नसलेल्या शुद्ध तेलाचा आग्रह ग्राहकांचा राहतो. त्यामुळे शेतकरी, ग्राहकांनी स्वतःच तेलबिया या ठिकाणी आणून समक्ष खाद्यतेल घेऊन जाण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. विकतचे खाद्यतेल खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या तेलबिया गाळपातून तेलाची उपलब्धता वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा छोटासा प्रकल्प आहे.

कोणत्या तेलबियांचे होणार गाळप
शुद्ध खाद्यतेलांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, मोहरी आदी तेलबियांचे गाळप या ठिकाणी होईल. ग्राहकांना तेलबियांच्या गाळपातून खाद्यतेल आणि पेंड घेऊन गेल्यास प्रति किलो तीस रुपये शुल्क आकारणी होईल. तर केवळ तयार खाद्यतेल नेल्यास १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अर्थशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी दिली.
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Bring oilseeds and edible oil
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university शिवाजीनगर नगर उपक्रम पुणे विकास पुढाकार initiatives खेड भेसळ सोयाबीन अर्थशास्त्र economics विभाग sections प्रकाश पवार
Search Functional Tags: 
महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, शिवाजीनगर, नगर, उपक्रम, पुणे, विकास, पुढाकार, Initiatives, खेड, भेसळ, सोयाबीन, अर्थशास्त्र, Economics, विभाग, Sections, प्रकाश पवार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Bring oilseeds and edible oil
Meta Description: 
Bring oilseeds and edible oil
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X