थंडीचा पिकावरील परिणाम कमी करणारे उपाय

सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

प्रत्येक वातावरणाचा कमी अधिक परिणाम फळ पिकांवर पडत असतो. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणामही होतो. मात्र शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात ठेऊन तीव्र परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असते. वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे उत्पादनातील घट रोखता येते. सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

 • कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते.
 • जमिनीचे तापमान कमी होते.
 • वनस्पतीच्या पेशी मरतात.
 • फळ पिकांमध्ये फळे तडकतात. उदा. प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इ. फळांमध्ये तडकण्याचे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही.
 • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उदा. पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लीफ मायनर इ.
 • थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळे यावर प्रतिकूल परिणाम होतो.
 • अतिथंड हवामानात पेशींमधील पाणी गोठते. पेशी कणातील पाणी नष्ट झाल्याने पेशी शक्तिहीन होतात व मरतात.
 • अतिशीत तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो.
 • रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात.
 •  कोवळी पाने, फुट आणि फांद्या सुकतात. झाडांना इजा पोहोचते.
 •  तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळांपर्यंत पोहोचते. इजा झालेल्या भागातून बुरशींचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. सालीचा इजा झालेला भाग खरवडून बोर्डो पेस्ट लावल्यास फायदा होतो.

फळ पिकानुसार होणारे थेट परिणाम 

 •  आंब्याचा मोहोर जळतो.
 •  सदाहरित झाडे (आंबा, लिंबूवर्गीय फळ पिके, केळी, किवी इ.) ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात.
 •  तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. अति थंडीमध्ये झाडे मरतात.
 •  तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी झाल्यास केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.
 • द्राक्ष वेलीच्या वाढ आणि फुलोरा अवस्थेत कडक थंडीचा विपरीत परिणाम होतो. फळगळ होते, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते. तसेच वेली मरतात.
 • तापमान १० अंश सेल्सिअसने कमी झाल्यास संत्रा, मोसंबीची वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.

नियंत्रणाचे उपाय :
• थंडी आणि वाऱ्यापासून फळबागेच्या संरक्षणासाठी बागेच्या पश्‍चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, सुरू, बोगनवेल, घायपात, शेवगा, ग्लिरिसिडीया, पांगरा, मलबेरी, किंवा बांबू यांसारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
• रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.
• फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पाला पाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर मिळेल, याची काळजी घ्यावी.
• थंडीमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान थोडे अधिक असते. थंडीची पूर्वसूचना मिळताच फळ बागेमध्ये रात्री अथवा पहाटे
ठिबकद्वारे पाणीपुरवठा करावा. यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.
• झाडाच्या खोडापाशी तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मुळांच्या परिसरामध्ये उष्णता टिकून राहील. कमी तापमानाचा झाडांच्या मुळांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.
• केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबत पेंड कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारी उष्णता तापमान कमी करण्यास मदत करते. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो. केळीच्या बागेस रात्री पाणी द्यावे. १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडाची पाने गुंडाळावी.
• द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
• डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे. तसेच बोरॅक्सची (०.२ टक्का) फवारणी करावी.
• पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून द्यावी. झाडांची जल व अन्नद्रव्य शोषण वहनाची क्षमता वाढते. पेशींचा काटकपणा वाढतो.
• थंडीचे प्रमाण कमी होईतोवर फळबागांतील फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. अतिरिक्त छाटणी करू नये.
• रोपवाटिकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट, तट्टे किंवा काळे पॉलिथिन याचे छप्पर उभारावे. असे छप्पर साधारण सूर्यास्तापूर्वीपासून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश पडेतोवर ठेवावे.
• नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा.

– बी. जी. म्हस्के, ९०९६९६१८०१
(सहायक प्राध्यापक, एम. जी. एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद)
हरिष अ. फरकाडे, ८९२८३६३६३८
(सहायक प्राध्यापक – वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

News Item ID: 
820-news_story-1637586715-awsecm-256
Mobile Device Headline: 
थंडीचा पिकावरील परिणाम कमी करणारे उपाय
Appearance Status Tags: 
Section News
बागेमध्ये मध्यम ओलसर पालापाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर करावा.बागेमध्ये मध्यम ओलसर पालापाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर करावा.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Measures to reduce the effects of cold on crops
Author Type: 
External Author
बी. जी. म्हस्के, हरिष फरकाडे
थंडी खत fertiliser द्राक्ष केळी banana डाळ डाळिंब अंजीर पपई papaya हवामान पाणी water बळी bali लिंबू lemon नासा मोसंबी sweet lime फळबाग horticulture बांबू bamboo रब्बी हंगाम मात mate मूग तण weed म्युरेट ऑफ पोटॅश muriate of potash सूर्य औरंगाबाद aurangabad विभाग sections
Search Functional Tags: 
थंडी, खत, Fertiliser, द्राक्ष, केळी, Banana, डाळ, डाळिंब, अंजीर, पपई, papaya, हवामान, पाणी, Water, बळी, Bali, लिंबू, Lemon, नासा, मोसंबी, Sweet lime, फळबाग, Horticulture, बांबू, Bamboo, रब्बी हंगाम, मात, mate, मूग, तण, weed, म्युरेट ऑफ पोटॅश, Muriate of Potash, सूर्य, औरंगाबाद, Aurangabad, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Measures to reduce the effects of cold on crops
Meta Description: 
Measures to reduce the effects of cold on crops
सध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली नाही. या आठवड्यात शेवटीपर्यंत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X