दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची प्रगती

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता.६) दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. आज दक्षिण कर्नाटकात वारे दाखल झाले असले तरी पश्‍चिम किनारपट्टीवरील वाटचाल जैसे थे आहे.  
 
यंदा मॉन्सून चार दिवस उशिराने केरळात येण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मॉन्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भूमीवर आगमन होतात मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंम्बतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना पश्‍चिम किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी (ता.४) केरळचा कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, हसनपर्यंत आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले. 

‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली असली तरी अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नव्हता. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह हळूहळू सुरळीत होऊन, कर्नाटक, तामिळनाडूच्या अंतर्गत भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) कर्नाटक, तामिळनाडू, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

News Item ID: 
820-news_story-1591432795-280
Mobile Device Headline: 
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची प्रगती
Appearance Status Tags: 
Mukhya News
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची प्रगतीदक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची प्रगती
Mobile Body: 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता.६) दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. आज दक्षिण कर्नाटकात वारे दाखल झाले असले तरी पश्‍चिम किनारपट्टीवरील वाटचाल जैसे थे आहे.  
 
यंदा मॉन्सून चार दिवस उशिराने केरळात येण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मॉन्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भूमीवर आगमन होतात मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंम्बतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना पश्‍चिम किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी (ता.४) केरळचा कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, हसनपर्यंत आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले. 

‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली असली तरी अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नव्हता. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह हळूहळू सुरळीत होऊन, कर्नाटक, तामिळनाडूच्या अंतर्गत भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) कर्नाटक, तामिळनाडू, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

English Headline: 
agriculture news in marathi Monsoon Onset over south Karnataka and some parts of Tamilnadu
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे मॉन्सून कर्नाटक हवामान विभाग sections किनारपट्टी केरळ अरबी समुद्र समुद्र निसर्ग श्रीलंका
Search Functional Tags: 
पुणे, मॉन्सून, कर्नाटक, हवामान, विभाग, Sections, किनारपट्टी, केरळ, अरबी समुद्र, समुद्र, निसर्ग, श्रीलंका
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Monsoon Onset over south Karnataka and some parts of Tamilnadu
Meta Description: 
Monsoon Onset over south Karnataka and some parts of Tamilnadu
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता.६) दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे.Source link

Leave a Comment

X