[ad_1]
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मातब्बर दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याने पहिल्यांदाच दूध संघांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे या भागातील अनेक मातब्बर संघांचे संकलन ५० हजारांपासून एक लाख लिटरपर्यंत घटले आहे. घटत्या दूध संकलनाच्या पार्श्वभूमीवर दूध संकलन विभागांना पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याचा आदेश दिला आहे. इतर दूध संघांचे दूध मिळवण्यासाठी आता दूध संघांच्या कर्मचाऱ्यांना थेट दूध उत्पादकांच्या भेटी घ्याव्या लागत आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये दूध संघांमध्ये दूध मिळवण्यासाठी स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याबरोबर परराज्यांतील दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. दूध खरेदी दरात वाढ केल्यास दूध विक्री वाढ करणेही क्रमप्राप्त असल्याने येथील अनेक संघानी व्यावसायिक भूमिका घेत दूध खरेदी दरवाढ टाळली आहे. एकीकडे दूध उपपदार्थांचे दर वाढत असतानाच दुसरीकडे दूध उपलब्धता कमी होत असल्याने संघांची गोची झाली आहे.
दुधाचे संकलन कमी-जास्त झाल्यास राज्यातील इतर दूध संघ दूध खरेदी दरवाढ किंवा दर कमी करण्याचे धोरण ठरवतात. त्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रातील दूध संघ दर स्थिर तर ठेवण्याला प्राधान्य देतात. या भागातील दूध संघ तातडीने लवचिक भूमिका घेत नाहीत. वाढते ऊन व चाऱ्याची अनुपलब्धता यामुळे दूध संकलनात घट होत आहे. गाईच्या तुलनेत म्हशीच्या दुधाची घट मोठी आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून दूध संकलनात घट होण्यास प्रारंभ झाला. याचबरोबर दूध पावडर आणि पदार्थांचेही दर वाढले यामुळे संघाना अपेक्षित दूध मिळवणे अशक्य बनले.
बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. तसेच सार्वजनिक समारंभही वेगाने सुरू होण्याची शक्यता असल्याने दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे. दूध संघांजवळील दुग्धजन्य पदार्थाचा साठा झपाट्याने संपत आहे. नवीन पदार्थ तयार करण्यासाठी अतिरिक्त दुधाची गरज आहे. पण घटते दूध संकलन या संघापुढे डोकेदुखी ठरत असल्याची माहिती दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दुग्धजन्य पदार्थांचे वाढते भाव आणि दूध संकलनात घट यामुळे व्यवसायात तोटा होत असल्याने संघांचे दूध संकलन विभाग खडबडून जागे झाले आहेत. येत्या काही दिवसांत दूध संकलन वाढविण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
दरवाढीचे नियोजन पुढे ढकलले
दूध खरेदीदरात वाढ केल्यास दूध विक्री दरात वाढ करावी लागेल या भीतीपोटी दक्षिण महाराष्ट्रातील अनेक दूध संघांनी शेतकऱ्यांच्या गाईच्या दूध खरेदी दरात वाढ तातडीने करण्याचे नियोजन पुढे ढकलल्याने शेतकऱ्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात दुधाचे संकलन घटते यामुळे तातडीने दूध खरेदीदरात वाढ करण्याची गरज नसल्याचे मत दूध संघांच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. मात्र याला दूध उत्पादकांचा विरोध आहे.

[ad_2]
Source link