दक्षिण महाराष्ट्रात  पावसाची हजेरी 


पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वेंगुर्ला येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एका मागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत असल्याने दक्षिण भारतात पावसाने जोर धरला आहे. तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसत आहेत. सध्या अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. दोन दिवसांपासून राज्यातही ढगाळ हवामान होत आहे. सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. मंगळवारी (ता. १६) सायंकाळनंतर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. 

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये : 
कोकण : वेंगुर्ला ६०, दोडामार्ग, गुहागर, देवगड, सावंतवाडी प्रत्येकी ५०, रत्नागिरी ४०, कणकवली, खेड, मुलदे प्रत्येकी ३०, रामेश्वर, कुडाळ प्रत्येकी २०, वैभववाडी, दापोली, हर्णे, राजापूर, संगमेश्वर प्रत्येकी १०. 

मध्य महाराष्ट्र : चंदगड ५०, चिंचवड ३०, महाबळेश्वर, कागल प्रत्येकी २०, सातारा, कोल्हापूर, आजरा, सांगली, तासगाव प्रत्येकी १०. 

मराठवाडा : नांदेड २०. 

विदर्भ : एटापल्ली, आहेरी प्रत्येकी १०. 

अरबी समुद्रातील कमी दाबाची क्षेत्र होणार ठळक 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यालगत कमी दाबाची क्षेत्र सक्रिय आहेत. अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताना अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकण पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता. १८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

News Item ID: 
820-news_story-1637157360-awsecm-873
Mobile Device Headline: 
दक्षिण महाराष्ट्रात  पावसाची हजेरी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
In South Maharashtra The presence of rainIn South Maharashtra The presence of rain
Mobile Body: 

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वेंगुर्ला येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एका मागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत असल्याने दक्षिण भारतात पावसाने जोर धरला आहे. तर महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसत आहेत. सध्या अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. दोन दिवसांपासून राज्यातही ढगाळ हवामान होत आहे. सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. मंगळवारी (ता. १६) सायंकाळनंतर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. 

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये : 
कोकण : वेंगुर्ला ६०, दोडामार्ग, गुहागर, देवगड, सावंतवाडी प्रत्येकी ५०, रत्नागिरी ४०, कणकवली, खेड, मुलदे प्रत्येकी ३०, रामेश्वर, कुडाळ प्रत्येकी २०, वैभववाडी, दापोली, हर्णे, राजापूर, संगमेश्वर प्रत्येकी १०. 

मध्य महाराष्ट्र : चंदगड ५०, चिंचवड ३०, महाबळेश्वर, कागल प्रत्येकी २०, सातारा, कोल्हापूर, आजरा, सांगली, तासगाव प्रत्येकी १०. 

मराठवाडा : नांदेड २०. 

विदर्भ : एटापल्ली, आहेरी प्रत्येकी १०. 

अरबी समुद्रातील कमी दाबाची क्षेत्र होणार ठळक 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यालगत कमी दाबाची क्षेत्र सक्रिय आहेत. अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताना अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकण पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता. १८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi In South Maharashtra The presence of rain
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अरबी समुद्र समुद्र पूर floods कोकण konkan महाराष्ट्र maharashtra ऊस पाऊस पुणे सिंधुदुर्ग sindhudurg भारत हवामान कोल्हापूर नांदेड nanded विदर्भ vidarbha खेड कुडाळ चंदगड chandgad महाबळेश्वर कागल तासगाव आंध्र प्रदेश विभाग sections
Search Functional Tags: 
अरबी समुद्र, समुद्र, पूर, Floods, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, ऊस, पाऊस, पुणे, सिंधुदुर्ग, Sindhudurg, भारत, हवामान, कोल्हापूर, नांदेड, Nanded, विदर्भ, Vidarbha, खेड, कुडाळ, चंदगड, Chandgad, महाबळेश्वर, कागल, तासगाव, आंध्र प्रदेश, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In South Maharashtra The presence of rain
Meta Description: 
In South Maharashtra The presence of rain
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X