Take a fresh look at your lifestyle.

दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा ब्रॅण्ड

0

परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात युवा शेतकरी आनंद शिनगारे यांनी हळद प्रक्रिया उद्योगाची संधी शोधली. विविध बाजारपेठांचा अभ्यास केला. गुणवत्ता प्रधान उत्पादनावर भर दिला. त्यातून उद्योगाचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला. पुणे, मुंबई अशा शहरात त्यांनी आपल्या हळदीच्या ब्रॅण्डची ओळख तयार केली आहे. वर्षला एकहजार हून अधिक क्विंटल विक्री व ८० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे.
.
परभणी जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील शेतकरी कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन देऊ शकणाऱ्या हळदीकडे वळले आहेत. साहजिकच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु झाले आहेत. वालूर (ता.सेलू) येथील आनंद दिलीपराव सिनगारे हे त्यापैकीच एक उद्योजक आहेत. त्यांची १५ एकर शेती आहे. कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन ते घेतात.

हळद उद्योगाची दिशा

 • बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आनंद यांनी शेतीसोबत भुसार मालाचा व्यवसाय सुरु केला. स्थानिक परिसर तसेच शेजारील हिंगोली जिल्ह्यात कच्चा माल (हळद) उपलब्ध होत असल्याने गावात हळद पावडर निर्मितीचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून ते हळद खरेदी करीत. गावातील गिरणीमधून पावडर तयार करून गाव परिसरात त्याची विक्री करीत. ग्राहकांना उत्तम क्वालिटी दिल्याने पावडरीला मागणी वाढू लागली.
 • सन २०१७ मध्ये ४० हजार रुपये खर्च करून छोटी गिरणी खरेदी करून हळद पावडर निर्मितीची क्षमता वाढवली. दररोज सुमारे पाच क्विंटल पावडर तयार व्हायची. पुणे येथील एका मसाले कंपनीला पाठविलेली पावडर पसंतीस उतरल्यानंतर नियमित मागणी सुरू झाली. मग मुंबई, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणांहूनही विचारणा होऊ लागली. उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

उद्योगाचा विस्तार
मागणीच्या प्रमाणात आवश्यक पुरवठा होण्याच्या दृष्टीने उच्च क्षमतेचे पल्वरायझर यंत्र लागणार होते. भांडवल गुंतवणूक १५ लाख रुपयांची होती. नियमित चांगल्या आर्थिक व्यवहारामुळे एका बॅंकेत पत निर्माण झाली होती. त्यातून बॅंकेने सात लाख रुपये मंजूर केले. अशा रितीने अन्य रकमेची जमवाजमव करून यंत्राची उपलब्धता झाली. सन २०१८ च्या फेब्रुवारीमध्ये वालूर -सेलू रस्त्यावरील शेतात ४४ बाय २६ फूट जागेत दररोज ५० क्विंटल हळद पावडर तयार होऊ लागली. जवळा बाजार (जि.हिंगोली) येथील हळद उद्योजक राजेश झांजरी यांनी सतत प्रोत्साहन दिले. त्यामुळे उद्योजक म्हणून आत्मविश्‍वास तयार झाला.

हळद पावडर उद्योग दृष्टिक्षेपात

 • आवश्‍यक हळद कांडी तसेच गोल हळकुंड (गठ्ठा) यांची जवळा बाजार व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी
 • सुमारे २०० शेतकऱ्यांचे त्यामध्ये नेटवर्क
 • हळदीची ग्रेड वन व ग्रेड टू अशी प्रतवारी
 • सन २०१६ मध्ये अभिनव फूडस प्रॉडक्ट नावाने प्रक्रिया उद्योगाची नोंदणी
 • शांतिसागर ब्रॅण्डने ग्रेड १ हळदीची १० किलो पॅकिंगमधून विक्री. तर १० व ५० किलो पॅकिंगमधून ग्रेड टू हळदीची महावीर ब्रॅण्डने विक्री.
 • बाजारपेठेत डबल पॉलीशींग केलेल्या हळदीला मागणी आहे. हे ओळखून वरून लोखंडी व आतून लाकडी असलेल्या ड्रमव्दारे ही प्रक्रिया केली जाते. गेल्यावर्षी ४०० ते ५०० क्विंटल विक्री केली. त्यास प्रति क्विंटल ७५०० ते ८५०० रुपये दर मिळाले.
 • घाऊक विक्रीचे दर- प्रति क्विंटल- ७००० ते ७५०० रू.
 • पावडर उत्पादन खर्च- ८०० ते ९०० रू. (क्विंटलला)
 • सध्याची उलाढाल- सुमारे ८० लाख रुपयांपर्यंत
वर्ष हळद पावडर विक्री (क्विंटल)
२०१७-१८ १००
२०१८-१९ ७००
२०१९-२० २२००
चालू वर्ष आत्तापर्यंत ९०० क्विंटल

लॉकडाऊनच्या काळात प्रतिसाद
यंदा कोरोना लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सुरुवातीचे १० ते १५ दिवस जिल्ह्याबाहेर वाहतूक बंद होती. त्यामुळे पुरवठ्यासाठी अडचणी आल्या. परंतु नियम शिथिल होऊ लागले तसे मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणाचे किराणा व्यापारी, मसाले उद्योजक यांना पुरवठा सुरु केला. मध्यस्थांच्या मार्फत आखाती देशातही यंदा ३०० क्विंटल हळद पाठवण्यात आली. ल़ॉकडाऊनच्या काळात सुमारे ८०० क्विंटल पावडरीची विक्री झाली. त्याची किंमत सुमारे ६० लाख रुपये होते.

रोजगार निर्मिती…
उद्योगाचा केलेला विस्तार व बाराही महिने असलेली संधी पाहता सध्या सुमारे सहा ते सात कायमस्वरूपी कामगार आहेत. तर हंगामी मजुरांची संख्या धरून किमान १५ जणांना वर्षभर रोजगार देणे शक्य झाले आहे.

ॲग्रोवन तर्फे पुरस्कार
पत्नी अंकिता यांची उद्योगात मोठी मदत होते. येत्या काळात ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २५० ग्रॅम अशा पाउच पॅकिंगमधून हळद पावडर उपलब्ध करण्याचा मानस आहे. मागील वर्षी औरंगाबाद येथे डिसेंबरमध्ये ॲग्रोवनतर्फे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शिनगारे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

माझ्या उद्योगाचा महत्त्वाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना झाला. वाहतूक, अडत आदी कोणताही खर्च न येता बाजारभावांप्रमाणे त्यांची हळद मी बांधावरून खरेदी करतो. त्याचा मोठा फायदा त्यांना व मलाही होतो. बाजारपेठेत कितीही स्पर्धा असली तरी गुणवत्ता हाच मुख्य निकष ठेवल्याने व्यवसायात पाय रोवणे मला शक्य झाले.
-आनंद शिनगारे- ९९७०२४०३०१

News Item ID: 
820-news_story-1591361510-173
Mobile Device Headline: 
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा ब्रॅण्ड
Appearance Status Tags: 
Mukhya News
Turmeric powder making machineTurmeric powder making machine
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi Shingare's brand of quality turmeric powder
Author Type: 
Internal Author
माणिक रासवे
परभणी parbhabi हळद पुणे मुंबई mumbai शेती farming कापूस तूर सोयाबीन शिक्षण education व्यवसाय profession औरंगाबाद aurangabad यंत्र machine वन forest व्यापार रोजगार employment प्रदर्शन स्पर्धा
Search Functional Tags: 
परभणी, Parbhabi, हळद, पुणे, मुंबई, Mumbai, शेती, farming, कापूस, तूर, सोयाबीन, शिक्षण, Education, व्यवसाय, Profession, औरंगाबाद, Aurangabad, यंत्र, Machine, वन, forest, व्यापार, रोजगार, Employment, प्रदर्शन, स्पर्धा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Shingare's brand, quality turmeric powder, turmeric processing
Meta Description: 
Shingare's brand of quality turmeric powder
परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात युवा शेतकरी आनंद शिनगारे यांनी हळद प्रक्रिया उद्योगाची संधी शोधली. विविध बाजारपेठांचा अभ्यास केला. गुणवत्ता प्रधान उत्पादनावर भर दिला. त्यातून उद्योगाचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला. पुणे, मुंबई अशा शहरात त्यांनी आपल्या हळदीच्या ब्रॅण्डची ओळख तयार केली आहे. वर्षला एकहजार हून अधिक क्विंटल विक्री व ८० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे.Source link

X