Take a fresh look at your lifestyle.

दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !

0

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत (ता.१) जवळपास २४२ शेतकऱ्यांनी एकूण ८,७५० क्विंटल सोयाबीनचा शेतीमाल तारण ठेवत या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सभापती ललीतकुमार शहा यांनी दिली.

बाजारपेठेवर लक्ष ठेवून भावातील शेतीमालाच्या दरात मिळणारा फायदा पदरी पाडून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक गरजा तत्काळ भागविण्यासाठी शेतीमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. लातूर बाजार समितीच्या वतीने ऑक्टोबरमध्ये १८ तारखेला शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली.

सध्या सोयाबीनला मिळणारा भाव लक्षात घेऊन अनेक शेतकरी या योजनेतर्गत सोयाबीन तारण ठेवत लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण ठेवलेल्या सोयाबीनच्या शेतीमालास चालू बाजार भावाच्या ७५ टक्के रक्कम केवळ ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते. 

या सहा महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यास शेतकरी तारण मालाची विक्री करून मिळणारा फायदा पदरी पाडून घेऊ शकतात. त्यामुळेच या योजनेस अल्पावधीतच शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत गोदाम भाडे आकारले जात नाही. तसेच शेतीमालास विमा संरक्षण आहे. त्याची पूर्ण विमा रक्कम बाजार समिती भरते. या योजनेचा शेतकऱ्यांनी नास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही सभापती ललीतकुमार शहा यांनी केले आहे.

सव्वातीन कोटींची शेतकऱ्यांना उचल…
लातूर बाजार समितीच्या शेतीमाल तारण योजनेत १७४ शेतकऱ्यांनी ६५२३.४० क्विंटल सोयाबीन तारण ठेवले असून, शेतकऱ्यांनी जवळपास २ कोटी ५९ लाख रुपये उचल घेतली आहे. उपबाजार पेठ-मुरूड येथे १०००  टनांचे नवीन गोडाउन बांधले असून, तेथे ६८ शेतकऱ्यायांनी २२२६.७२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले आहे. त्यावर शेतकऱ्यानी जवळपास ६९ लाख रुपये  उचल घेतली आहे. एकूण २४२ शेतकऱ्यांनी ८,७५० क्विंटल शेतीमाल तारण ठेवून ३ कोटी २९ लाख ५४ हजार १३० रुपये रक्कम उचल घेतल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

News Item ID: 
820-news_story-1635955486-awsecm-496
Mobile Device Headline: 
दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !
Appearance Status Tags: 
Mukhya News
दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !दर कमी होताच; शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन तारण !
Mobile Body: 

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत (ता.१) जवळपास २४२ शेतकऱ्यांनी एकूण ८,७५० क्विंटल सोयाबीनचा शेतीमाल तारण ठेवत या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सभापती ललीतकुमार शहा यांनी दिली.

बाजारपेठेवर लक्ष ठेवून भावातील शेतीमालाच्या दरात मिळणारा फायदा पदरी पाडून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक गरजा तत्काळ भागविण्यासाठी शेतीमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. लातूर बाजार समितीच्या वतीने ऑक्टोबरमध्ये १८ तारखेला शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली.

सध्या सोयाबीनला मिळणारा भाव लक्षात घेऊन अनेक शेतकरी या योजनेतर्गत सोयाबीन तारण ठेवत लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण ठेवलेल्या सोयाबीनच्या शेतीमालास चालू बाजार भावाच्या ७५ टक्के रक्कम केवळ ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते. 

या सहा महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यास शेतकरी तारण मालाची विक्री करून मिळणारा फायदा पदरी पाडून घेऊ शकतात. त्यामुळेच या योजनेस अल्पावधीतच शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत गोदाम भाडे आकारले जात नाही. तसेच शेतीमालास विमा संरक्षण आहे. त्याची पूर्ण विमा रक्कम बाजार समिती भरते. या योजनेचा शेतकऱ्यांनी नास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही सभापती ललीतकुमार शहा यांनी केले आहे.

सव्वातीन कोटींची शेतकऱ्यांना उचल…
लातूर बाजार समितीच्या शेतीमाल तारण योजनेत १७४ शेतकऱ्यांनी ६५२३.४० क्विंटल सोयाबीन तारण ठेवले असून, शेतकऱ्यांनी जवळपास २ कोटी ५९ लाख रुपये उचल घेतली आहे. उपबाजार पेठ-मुरूड येथे १०००  टनांचे नवीन गोडाउन बांधले असून, तेथे ६८ शेतकऱ्यायांनी २२२६.७२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवले आहे. त्यावर शेतकऱ्यानी जवळपास ६९ लाख रुपये  उचल घेतली आहे. एकूण २४२ शेतकऱ्यांनी ८,७५० क्विंटल शेतीमाल तारण ठेवून ३ कोटी २९ लाख ५४ हजार १३० रुपये रक्कम उचल घेतल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

English Headline: 
agriculture news in marathi In Latur As rates falls Farmers pledge soybeans in Government scheme
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
लातूर latur तूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee शेती farming तारण सोयाबीन व्याजदर
Search Functional Tags: 
लातूर, Latur, तूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, शेती, farming, तारण, सोयाबीन, व्याजदर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
As rates falls Farmers pledge soybeans in Government scheme
Meta Description: 
As rates falls Farmers pledge soybeans in Government scheme
लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X