दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही

पुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यंदा दहा वर्षांच्या आतील हरभरा बियाणे वाणांना प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देखील मिळेल. राज्याचे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी एका आदेशात बियाणे पुरवठ्याच्या नियोजनाबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. 

‘‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात हरभरा पिकाच्या दहा वर्षांवरील वाणांसाठी दिलेले यापूर्वीचे आर्थिक लक्ष्यांक काढून टाकावे. मात्र हेच लक्ष्यांक दहा वर्षांच्या आतील वाणांच्या वाटपासाठी वर्ग करण्यात यावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या वाणांचे प्रमाणित बियाणे मिळू शकेल,’’ अशा सूचना श्री. पाटील यांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत

चालू रब्बी हंगामात महाडीबीटी संकेतस्थळावर हरभरा बियाणे मिळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फक्त दहा वर्षांच्या आतील बियाणे देण्याचे बंधन असेल. त्यासाठी संबंधित बियाणे पुरवठादारांकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा वेळेत होईल, याची दक्षता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला घ्यावी लागणार आहे. 

अनुदानित बियाणे मिळवण्यास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडून गावच्या कृषी सहायकाला मिळणार आहे. कृषी सहायकाने शेतकऱ्यांना बियाणे परमीट वाटायचे असून, शेतकऱ्याने तेच परमीट संबंधित बियाणे विक्रेत्यांकडे जमा करायचे आहे. अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित पैसे शेतकऱ्याला भरावे लागेल. त्यानंतर विक्रेत्याकडून शेतकऱ्याला पैसे भरल्याची पावती आणि अनुदानित बियाणे मिळणार आहे.

शेतकरी उत्पादक संस्थांकडून 
बियाणे घेता येणार

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे पुरेसे बियाणे नसल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संस्थांकडून बियाणे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या कंपन्यांनी तयार केलेल्या प्रमाणित बियाण्यांची तपासणी केल्याचे अहवाल बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून मिळवावेत, अशाही सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

News Item ID: 
820-news_story-1635000438-awsecm-893
Mobile Device Headline: 
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही
Appearance Status Tags: 
Mukhya News
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही There is no subsidy for gram varieties above ten yearsदहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाही There is no subsidy for gram varieties above ten years
Mobile Body: 

पुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यंदा दहा वर्षांच्या आतील हरभरा बियाणे वाणांना प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान देखील मिळेल. राज्याचे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी एका आदेशात बियाणे पुरवठ्याच्या नियोजनाबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. 

‘‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात हरभरा पिकाच्या दहा वर्षांवरील वाणांसाठी दिलेले यापूर्वीचे आर्थिक लक्ष्यांक काढून टाकावे. मात्र हेच लक्ष्यांक दहा वर्षांच्या आतील वाणांच्या वाटपासाठी वर्ग करण्यात यावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नव्या वाणांचे प्रमाणित बियाणे मिळू शकेल,’’ अशा सूचना श्री. पाटील यांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या आहेत

चालू रब्बी हंगामात महाडीबीटी संकेतस्थळावर हरभरा बियाणे मिळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना फक्त दहा वर्षांच्या आतील बियाणे देण्याचे बंधन असेल. त्यासाठी संबंधित बियाणे पुरवठादारांकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा वेळेत होईल, याची दक्षता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला घ्यावी लागणार आहे. 

अनुदानित बियाणे मिळवण्यास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडून गावच्या कृषी सहायकाला मिळणार आहे. कृषी सहायकाने शेतकऱ्यांना बियाणे परमीट वाटायचे असून, शेतकऱ्याने तेच परमीट संबंधित बियाणे विक्रेत्यांकडे जमा करायचे आहे. अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित पैसे शेतकऱ्याला भरावे लागेल. त्यानंतर विक्रेत्याकडून शेतकऱ्याला पैसे भरल्याची पावती आणि अनुदानित बियाणे मिळणार आहे.

शेतकरी उत्पादक संस्थांकडून 
बियाणे घेता येणार

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे पुरेसे बियाणे नसल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संस्थांकडून बियाणे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या कंपन्यांनी तयार केलेल्या प्रमाणित बियाण्यांची तपासणी केल्याचे अहवाल बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून मिळवावेत, अशाही सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

English Headline: 
Agriculture News in Marathi There is no subsidy for gram varieties above ten years
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रब्बी हंगाम वर्षा varsha कृषी आयुक्त agriculture commissioner कृषी विभाग agriculture department विभाग sections पुणे विकास प्रशिक्षण training मात mate महाड mahad
Search Functional Tags: 
रब्बी हंगाम, वर्षा, Varsha, कृषी आयुक्त, Agriculture Commissioner, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, पुणे, विकास, प्रशिक्षण, Training, मात, mate, महाड, Mahad
Twitter Publish: 
Meta Keyword: 
There is no subsidy for gram varieties above ten years
Meta Description: 
There is no subsidy for gram varieties above ten years
राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे वाटताना दहा वर्षांवरील वाणांसाठी अनुदान देण्यात येऊ नये, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. शासकीय संस्थांकडे यंदा भरपूर बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा लागवडीला चालना मिळेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X