Take a fresh look at your lifestyle.

दादांचे बंधुप्रेम…मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी; बारामतीकरांनी अनुभवली राजकीय आतषबाजी

0

बारामती, जि. पुणे : ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनोव्हेशन सेंटरच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मंगळवारी (ता.२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेपुढे येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. कृषी खासगी विद्यापीठास मान्यता द्यावी, खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी द्यावी, अनेक चुकीचे निर्णय बदलण्याची गरज त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. लालफितीचा कारभारही कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या नेहमीच्या परखड शैलीत त्यांनी अनेक बाबी स्पष्टपणे मांडल्या. 

हाच धागा पकडून अजित पवार गमतीने आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आमचे बंधू आज लयच जोरात होते… साहेब, मुख्यमंत्री, मी इथे बसलेत पण बाबा थांबायलाच तयार नव्हते, काम करून घ्यायचे असेल त्याला पार उभा-आडव करून काम कसं होणार, गोड बोलून कुठतरी एखादा चिमटा काढून करून घ्यायचं, पण सारखे इकडे चिमटे, तिकडे चिमटे काढून नाही… पण ते आमचे मोठे बंधू पडतात, त्यामुळे जास्त काही बोलत नाही, अशी पुस्तीही गमतीने त्यांनी जोडली आणि गमतीने हात जोडून जी काही नोंद घ्यायची आहे बंधूराज… ती घेतलेली आहे इतकंच सांगतो,’’ असे म्हटल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. 

यावर मुख्यमंत्री बोलले नसते तरच नवल होत… मुख्यमंत्र्यांनीही याचा उल्लेख केला, ते म्हणाले, की दादा, आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबाबत बोललाच… आता तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा… काय काय करायचे आणि दादांनी आडकाठी आणली, तर तुम्ही माझ्याकडे या म्हणजे आपण दोघे पवारसाहेबांकडे जाऊन ते करून घेऊ… असे म्हटल्यावर पुन्हा हास्यकल्लोळ झाला. चांगल्या कामाला आम्ही कधीच आड येणार नाही, लालफिती असतील तर आपण कात्रीचे सेंटर काढू अशा शब्दात लालफिती दूर करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र पवार यांना आश्‍वासन दिले. महाराष्ट्र जगात सर्वोत्तम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच, असेही ते म्हणाले. 
दिवाळी सुरू झाली आहेच, काही काही जण म्हणतात, की फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेलेला नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जाता जाता विरोधकांना चिमटाही काढला. 

राजकारणात आम्हीसुद्धा पंचवीस वर्षांपूर्वी एक राजकीय इनक्युबेशन सेंटर उभ केलं होत… इनक्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात… आम्हीही अंडी उबवली… पुढं काय झालं हे तुम्ही बघताय…. आपण आपलं कर्तव्य केलं, पुढं काय करायचं हे ज्याच त्यानं ठरवायचं असतं. 

गाडीतून येताना अजितदादा सांगत होते, पुण्यानंतर बारामतीही आता नंबर दोनचे केंद्र बनेल… असं म्हणताच अजितदादा म्हणाले, ‘शिक्षणाचं’…..त्यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला….त्यावर हसून मुख्यमंत्री म्हणाले… वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी येथे शिकवल्या जातात.

  आम्हीही इनक्युबेशन सेंटर उभारले होते…
पवार कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी या वेळी मुक्त कंठाने प्रशंसा केली. विकासाचा ध्यास घेतलेले कुटुंबीय अशा शब्दांत त्यांनी त्यांची प्रशंसा केली. राजकारणात टीकाकार असतात व असलेच पाहिजेत, थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, आम्हीही इतकी वर्षे होतोच… तुमचे टीकाकार.. राज्याच्या राजकारणात शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वांनाच माहिती होती, ते असताना मला नेहमी म्हणायचे आपण बारामतीला जाऊन शरदबाबू काय करतोय ते पाहायला पाहिजे. राजकारणात पटत नसले तरी चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. अगदी पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्न तरी आणू नये, विघ्नसंतोषी लोक खूप असतात. हे विघ्नसंतोषी लोकांचे काम असतं, कामातील आनंद त्यांना कधीच समजत नाही.

News Item ID: 
820-news_story-1635917961-awsecm-486
Mobile Device Headline: 
दादांचे बंधुप्रेम…मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी; बारामतीकरांनी अनुभवली राजकीय आतषबाजी
Appearance Status Tags: 
Tajya News
दादांचे बंधुप्रेम...मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी; बारामतीकरांनी अनुभवली राजकीय आतषबाजीदादांचे बंधुप्रेम...मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी; बारामतीकरांनी अनुभवली राजकीय आतषबाजी
Mobile Body: 

बारामती, जि. पुणे : ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनोव्हेशन सेंटरच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मंगळवारी (ता.२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. 

संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेपुढे येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. कृषी खासगी विद्यापीठास मान्यता द्यावी, खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी द्यावी, अनेक चुकीचे निर्णय बदलण्याची गरज त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. लालफितीचा कारभारही कमी झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या नेहमीच्या परखड शैलीत त्यांनी अनेक बाबी स्पष्टपणे मांडल्या. 

हाच धागा पकडून अजित पवार गमतीने आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आमचे बंधू आज लयच जोरात होते… साहेब, मुख्यमंत्री, मी इथे बसलेत पण बाबा थांबायलाच तयार नव्हते, काम करून घ्यायचे असेल त्याला पार उभा-आडव करून काम कसं होणार, गोड बोलून कुठतरी एखादा चिमटा काढून करून घ्यायचं, पण सारखे इकडे चिमटे, तिकडे चिमटे काढून नाही… पण ते आमचे मोठे बंधू पडतात, त्यामुळे जास्त काही बोलत नाही, अशी पुस्तीही गमतीने त्यांनी जोडली आणि गमतीने हात जोडून जी काही नोंद घ्यायची आहे बंधूराज… ती घेतलेली आहे इतकंच सांगतो,’’ असे म्हटल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. 

यावर मुख्यमंत्री बोलले नसते तरच नवल होत… मुख्यमंत्र्यांनीही याचा उल्लेख केला, ते म्हणाले, की दादा, आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबाबत बोललाच… आता तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा… काय काय करायचे आणि दादांनी आडकाठी आणली, तर तुम्ही माझ्याकडे या म्हणजे आपण दोघे पवारसाहेबांकडे जाऊन ते करून घेऊ… असे म्हटल्यावर पुन्हा हास्यकल्लोळ झाला. चांगल्या कामाला आम्ही कधीच आड येणार नाही, लालफिती असतील तर आपण कात्रीचे सेंटर काढू अशा शब्दात लालफिती दूर करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र पवार यांना आश्‍वासन दिले. महाराष्ट्र जगात सर्वोत्तम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच, असेही ते म्हणाले. 
दिवाळी सुरू झाली आहेच, काही काही जण म्हणतात, की फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेलेला नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जाता जाता विरोधकांना चिमटाही काढला. 

राजकारणात आम्हीसुद्धा पंचवीस वर्षांपूर्वी एक राजकीय इनक्युबेशन सेंटर उभ केलं होत… इनक्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात… आम्हीही अंडी उबवली… पुढं काय झालं हे तुम्ही बघताय…. आपण आपलं कर्तव्य केलं, पुढं काय करायचं हे ज्याच त्यानं ठरवायचं असतं. 

गाडीतून येताना अजितदादा सांगत होते, पुण्यानंतर बारामतीही आता नंबर दोनचे केंद्र बनेल… असं म्हणताच अजितदादा म्हणाले, ‘शिक्षणाचं’…..त्यावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला….त्यावर हसून मुख्यमंत्री म्हणाले… वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी येथे शिकवल्या जातात.

  आम्हीही इनक्युबेशन सेंटर उभारले होते…
पवार कुटुंबीयांची उद्धव ठाकरे यांनी या वेळी मुक्त कंठाने प्रशंसा केली. विकासाचा ध्यास घेतलेले कुटुंबीय अशा शब्दांत त्यांनी त्यांची प्रशंसा केली. राजकारणात टीकाकार असतात व असलेच पाहिजेत, थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, आम्हीही इतकी वर्षे होतोच… तुमचे टीकाकार.. राज्याच्या राजकारणात शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वांनाच माहिती होती, ते असताना मला नेहमी म्हणायचे आपण बारामतीला जाऊन शरदबाबू काय करतोय ते पाहायला पाहिजे. राजकारणात पटत नसले तरी चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. अगदी पाठिंबा देता येत नसला तरी त्यात विघ्न तरी आणू नये, विघ्नसंतोषी लोक खूप असतात. हे विघ्नसंतोषी लोकांचे काम असतं, कामातील आनंद त्यांना कधीच समजत नाही.

English Headline: 
agriculture news in marathi Uddhav Thackery and Ajit Pawar wins hearts of people in Speech
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare शरद पवार sharad pawar अजित पवार ajit pawar बारामती पुणे पशुवैद्यकीय महाराष्ट्र maharashtra राजकारण politics वर्षा varsha मराठी शिक्षण education विकास बाळ baby infant बाळासाहेब ठाकरे मात mate
Search Functional Tags: 
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, शरद पवार, Sharad Pawar, अजित पवार, Ajit Pawar, बारामती, पुणे, पशुवैद्यकीय, महाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics, वर्षा, Varsha, मराठी, शिक्षण, Education, विकास, बाळ, baby, infant, बाळासाहेब ठाकरे, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Uddhav Thackery and Ajit Pawar wins hearts of people in Speech
Meta Description: 
Uddhav Thackery and Ajit Pawar wins hearts of people in Speech
ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनोव्हेशन सेंटरच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मंगळवारी (ता.२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X