Take a fresh look at your lifestyle.

दिवसा चटका, पहाटे गारठा

0


पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे. गेले काही दिवस दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे. आज (ता. २७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. राज्यातही मुख्यत: कोरडे हवामान असल्याने राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणासह राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाचा चटकाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. 

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढे आहे. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ ते २० अंशांदरम्यान असून, महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, त्याच्या प्रभावामुळे आजपर्यंत (ता. २७) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (१६.८), जळगाव – (१६.८), कोल्हापूर ३२ (२०.५), महाबळेश्‍वर – (१३.७), मालेगाव ३३ (१८.२), नाशिक ३१.६ (१७.६), सांगली ३३.१ (१८.९), सातारा ३१.३ (१७.९), सोलापूर ३३.८ (१६.६), सांताक्रूझ ३२.८ (२३.४), अलिबाग ३२.२ (२२.५), डहाणू ३२ (२३.१), रत्नागिरी ३२ (२२.९), औरंगाबाद ३०.२ (१६.७), नांदेड -(१६.३), उस्मानाबाद – (१८.३), परभणी ३१.९ (१८.०), अकोला ३२.७ (१८.०), अमरावती ३१.२ (१५.५), ब्रह्मपुरी ३४.४ (१६.३), बुलडाणा २९.२ (१७.१), चंद्रपूर ३२.४ (२०), गडचिरोली ३२.४(१९.४), गोंदिया ३२.० (१८.०), नागपूर ३२.४ (१८.१), वर्धा ३२.६ (१९), वाशीम ३२(२०), यवतमाळ ३१ (१६.५).
 

News Item ID: 
820-news_story-1635257114-awsecm-228
Mobile Device Headline: 
दिवसा चटका, पहाटे गारठा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Click during the day, hail in the morningClick during the day, hail in the morning
Mobile Body: 

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे. गेले काही दिवस दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे. आज (ता. २७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. राज्यातही मुख्यत: कोरडे हवामान असल्याने राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकणासह राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाचा चटकाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. 

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढे आहे. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ ते २० अंशांदरम्यान असून, महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, त्याच्या प्रभावामुळे आजपर्यंत (ता. २७) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (१६.८), जळगाव – (१६.८), कोल्हापूर ३२ (२०.५), महाबळेश्‍वर – (१३.७), मालेगाव ३३ (१८.२), नाशिक ३१.६ (१७.६), सांगली ३३.१ (१८.९), सातारा ३१.३ (१७.९), सोलापूर ३३.८ (१६.६), सांताक्रूझ ३२.८ (२३.४), अलिबाग ३२.२ (२२.५), डहाणू ३२ (२३.१), रत्नागिरी ३२ (२२.९), औरंगाबाद ३०.२ (१६.७), नांदेड -(१६.३), उस्मानाबाद – (१८.३), परभणी ३१.९ (१८.०), अकोला ३२.७ (१८.०), अमरावती ३१.२ (१५.५), ब्रह्मपुरी ३४.४ (१६.३), बुलडाणा २९.२ (१७.१), चंद्रपूर ३२.४ (२०), गडचिरोली ३२.४(१९.४), गोंदिया ३२.० (१८.०), नागपूर ३२.४ (१८.१), वर्धा ३२.६ (१९), वाशीम ३२(२०), यवतमाळ ३१ (१६.५).
 

English Headline: 
Agriculture news in Marathi Click during the day, hail in the morning
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
किमान तापमान पुणे हवामान विभाग sections मॉन्सून पूर floods कोकण konkan विदर्भ vidarbha कमाल तापमान केरळ भारत जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
किमान तापमान, पुणे, हवामान, विभाग, Sections, मॉन्सून, पूर, Floods, कोकण, Konkan, विदर्भ, Vidarbha, कमाल तापमान, केरळ, भारत, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Click during the day, hail in the morning
Meta Description: 
Click during the day, hail in the morning
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे. गेले काही दिवस दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X