Take a fresh look at your lifestyle.

दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते…

0

सांगली : यंदाबी निसर्ग आमच्यावर कोपला… निसर्गानं पिकाचं नुकसान झालं असलं, तरीबी… आमी पुन्हा नव्या जोमानं शेतात कष्ट करून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी नव्या जोमाने उभा राहतूया… पणतीच्या प्रकाशानं आमचं आयुष्य उजळून निघणार हाय… शेतकऱ्यांना संकट नवीन नाहीत, मात्र सणात, दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते… असं आटपाडीतील शेतकरी किशोरकुमार देशमुख सांगत होते.

सांगली जिल्ह्याला पश्‍चिम आणि मध्य भागात कृष्णा आणि वारणेचं पाणी लाभलं आहे. तर पूर्वी नेहमी दुष्काळी भाग होता. गेल्या चार वर्षांपासून उन्हाळ्यात केवळ तलाव भरून देण्यासाठी योजना सुरू केली जाते. वारणेतून सहा टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचा निर्णय झाला आहे.

कधी नैसर्गिक संकट तर कधी पिकावर येणारं कीड-रोगाचं संकट यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कृष्णा आणि वारणा नदीला महापूराचे नवे संकट येऊ लागलं आहे. यामुळे पिकाचं नुकसान होते. तर दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करणारा शेतकरी. अशी दोन विचित्र परिस्थितीशी इथला शेतकरी लढतो आहे.

पावसानं पीक गेली उत्पादन कमी झालं यामुळं शेतकरी खचला. पण कष्टासमोर कधी हार मानली नाही. शेतकऱ्यांच्यावर कितीही नैसर्गिक संकटे आली, तरी त्यातून मार्ग संकटावर मात करण्यासाठी उभा राहतोय. तर कधी नवे प्रयोग करण्यासाठी शेतकरी पुढे येतोय. कितीही संकट आली तरी दिवाळी म्हटलं की आमची ऊर्जा कमी होत नाही.

आज ना उद्या आमचं चांगलं होईल, या आशेवर जगतोय. महापुरानं नुकसान झालेल्या पिकासाठी शासनाने तुटपुंजी मदत केली खरी, पण त्यातून आमची दिवाळी होणार का? घेतलेली कर्ज तशीच राहिली. आमची दिवाळी गोड व्हावी, असं आम्हाला देखील वाटतं. त्यामुळं दिवाळीसारख्या सणाला घरातील सदस्य तल्लीन होऊन उत्साहाने दिवाळी साजरी करण्याचा मानस ठेवला आहे.

नेहमी दुष्काळी असणाऱ्या तालुक्यात परतीच्या पावसाची कृपादृष्टी झाली. पण या पावसानं खरिपातील पिकाचं नुकसान झालं. पण रब्बी हंगामासाठी हा पाऊस काही प्रमाणात फायदेशीर ठरत आहे. त्यातही योजनेचं पाणी आलं. तलाव भरून दिलं. त्यामुळे पाणीटंचाई दूर झाली. गावातील पीक पद्धतीही काहीशी बदलली आहे. ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढं आला आहे. त्यामुळं एक नवा प्रकाश आमच्या आयुष्यात येत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिवाळीबाबत व्यक्त केली.

हळ्ळी (ता. जत) गावातील भीमराव पाटील सांगत होते, ‘‘आमचा तालुका दुष्काळी. दरवर्षी पाणीटंचाई. पिकांना पाणी नाही. पण गेल्या दोन वर्षांपासून आमच्या तालुक्यातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. यंदा देखील चांगला पाऊस झाला. खरीप मधली तूर या पावसानं गेली. तूर पिकातून मिळणार पैसा हा खर्च निघेल अशी आशा होती. पण ती आशा धुळीस मिळाली.
शेतात लिंबू लागवड आहे. तर नवीन सीताफळीची लागवड केली आहे. सध्या लिंबू विक्री करून पैसा उभा करत आहे.  त्यापैशातून प्रपंच चालू आहे. पण ऊस पिकास हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. आता उसावर आमच्‍या कुटुंबाची आर्थिक मदार आहे. पिकासाठी सोसायटी घेतली आहे. उसाचे दर चांगले मिळालेतर कर्जाची परत फेड करता येईल. दिवाळी म्हटलं की उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. या सणामुळे आम्हास नवी उमेद येते.’’

News Item ID: 
820-news_story-1635955167-awsecm-192
Mobile Device Headline: 
दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते…
Appearance Status Tags: 
Mukhya News
दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते... दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते...
Mobile Body: 

सांगली : यंदाबी निसर्ग आमच्यावर कोपला… निसर्गानं पिकाचं नुकसान झालं असलं, तरीबी… आमी पुन्हा नव्या जोमानं शेतात कष्ट करून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी नव्या जोमाने उभा राहतूया… पणतीच्या प्रकाशानं आमचं आयुष्य उजळून निघणार हाय… शेतकऱ्यांना संकट नवीन नाहीत, मात्र सणात, दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते… असं आटपाडीतील शेतकरी किशोरकुमार देशमुख सांगत होते.

सांगली जिल्ह्याला पश्‍चिम आणि मध्य भागात कृष्णा आणि वारणेचं पाणी लाभलं आहे. तर पूर्वी नेहमी दुष्काळी भाग होता. गेल्या चार वर्षांपासून उन्हाळ्यात केवळ तलाव भरून देण्यासाठी योजना सुरू केली जाते. वारणेतून सहा टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचा निर्णय झाला आहे.

कधी नैसर्गिक संकट तर कधी पिकावर येणारं कीड-रोगाचं संकट यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कृष्णा आणि वारणा नदीला महापूराचे नवे संकट येऊ लागलं आहे. यामुळे पिकाचं नुकसान होते. तर दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करणारा शेतकरी. अशी दोन विचित्र परिस्थितीशी इथला शेतकरी लढतो आहे.

पावसानं पीक गेली उत्पादन कमी झालं यामुळं शेतकरी खचला. पण कष्टासमोर कधी हार मानली नाही. शेतकऱ्यांच्यावर कितीही नैसर्गिक संकटे आली, तरी त्यातून मार्ग संकटावर मात करण्यासाठी उभा राहतोय. तर कधी नवे प्रयोग करण्यासाठी शेतकरी पुढे येतोय. कितीही संकट आली तरी दिवाळी म्हटलं की आमची ऊर्जा कमी होत नाही.

आज ना उद्या आमचं चांगलं होईल, या आशेवर जगतोय. महापुरानं नुकसान झालेल्या पिकासाठी शासनाने तुटपुंजी मदत केली खरी, पण त्यातून आमची दिवाळी होणार का? घेतलेली कर्ज तशीच राहिली. आमची दिवाळी गोड व्हावी, असं आम्हाला देखील वाटतं. त्यामुळं दिवाळीसारख्या सणाला घरातील सदस्य तल्लीन होऊन उत्साहाने दिवाळी साजरी करण्याचा मानस ठेवला आहे.

नेहमी दुष्काळी असणाऱ्या तालुक्यात परतीच्या पावसाची कृपादृष्टी झाली. पण या पावसानं खरिपातील पिकाचं नुकसान झालं. पण रब्बी हंगामासाठी हा पाऊस काही प्रमाणात फायदेशीर ठरत आहे. त्यातही योजनेचं पाणी आलं. तलाव भरून दिलं. त्यामुळे पाणीटंचाई दूर झाली. गावातील पीक पद्धतीही काहीशी बदलली आहे. ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढं आला आहे. त्यामुळं एक नवा प्रकाश आमच्या आयुष्यात येत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिवाळीबाबत व्यक्त केली.

हळ्ळी (ता. जत) गावातील भीमराव पाटील सांगत होते, ‘‘आमचा तालुका दुष्काळी. दरवर्षी पाणीटंचाई. पिकांना पाणी नाही. पण गेल्या दोन वर्षांपासून आमच्या तालुक्यातील परिस्थिती काहीशी बदलली आहे. यंदा देखील चांगला पाऊस झाला. खरीप मधली तूर या पावसानं गेली. तूर पिकातून मिळणार पैसा हा खर्च निघेल अशी आशा होती. पण ती आशा धुळीस मिळाली.
शेतात लिंबू लागवड आहे. तर नवीन सीताफळीची लागवड केली आहे. सध्या लिंबू विक्री करून पैसा उभा करत आहे.  त्यापैशातून प्रपंच चालू आहे. पण ऊस पिकास हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. आता उसावर आमच्‍या कुटुंबाची आर्थिक मदार आहे. पिकासाठी सोसायटी घेतली आहे. उसाचे दर चांगले मिळालेतर कर्जाची परत फेड करता येईल. दिवाळी म्हटलं की उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. या सणामुळे आम्हास नवी उमेद येते.’’

English Headline: 
agriculture news in marathi Farmers from Sangli says we get energy in Diwali festival
Author Type: 
External Author
अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली sangli निसर्ग दिवाळी मात mate किशोरकुमार पाणी water पूर floods कर्ज रब्बी हंगाम ऊस पाऊस पाणीटंचाई खरीप तूर लिंबू lemon सीताफळ custard apple
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, निसर्ग, दिवाळी, मात, mate, किशोरकुमार, पाणी, Water, पूर, Floods, कर्ज, रब्बी हंगाम, ऊस, पाऊस, पाणीटंचाई, खरीप, तूर, लिंबू, Lemon, सीताफळ, Custard Apple
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Farmers from Sangli says we get energy in Diwali festival
Meta Description: 
Farmers from Sangli says we get energy in Diwali festival
शेतकऱ्यांना संकट नवीन नाहीत, मात्र सणात, दिवाळीत आम्हाला संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळते… असं आटपाडीतील शेतकरी किशोरकुमार देशमुख सांगत होते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X