Take a fresh look at your lifestyle.

दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणार

0

पुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी विद्यापीठे व संलग्न कृषी महाविद्यालयांमधील वर्ग पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, स्थानिक जिल्हा प्रशासनाची मान्यता आणि लसीकरण अशा दोन मुख्य अटींचे पालन सक्तीचे असल्याने प्रत्यक्षात दिवाळीनंतरच विद्यापीठे व महाविद्यालये गजबजतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

राज्यातील नियमित शिक्षणाचे पहिली ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झालेले आहेत. याशिवाय अकृषी विद्यापीठे व उच्च शिक्षणाची अकृषी महाविद्यालये झाली. त्यामुळे, कृषी शिक्षण संस्थांचे वर्ग केव्हापासून सुरू होणार, याबाबत राज्यभरातून विचारणा सुरू होती. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व ‘कृषी’चे वर्ग बुधवारपासून (ता. २०) सुरू करण्यास मान्यता दिली. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठांचे प्रत्यक्ष पदवीदान समारंभ झालेले नाहीत. तसेच, काही अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग चालू असले तरी प्रत्यक्ष अध्यापनातून होणारे लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष वर्ग होण्यासाठी अध्यापक वर्ग व विद्यार्थी उत्सुक आहेत.

‘‘कृषी शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असली तरी स्थानिक पातळीवर तयारी झाली नाही. स्थानिक प्रशासनाची मान्यता मिळवणे, परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वेगळी तयारी, विद्यार्थ्यांचे लसीकरण याविषयीचे नियोजन बाकी आहे. त्यासाठी दिवाळीपर्यंत कालावधी हवा आहे,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले की, ‘‘आमच्या विद्यापीठाच्या अखत्यारित पाच हजार विद्यार्थी शिकतात. नियोजनाची बाजू किचकट व आव्हानात्मक आहे. नगर जिल्ह्यात कोविडची भीती अद्यापही आहे. परिणामी आम्ही सावधपणे पावले टाकत आहोत. यंदाचा पदवीदान सोहळादेखील निवडक विद्यार्थ्यांसाठी असेल. इतर विद्यार्थी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होतील.’’

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले म्हणाले की, ‘‘कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष वर्गांत उपस्थित राहून शिक्षण घेण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत. पदव्युत्तर, आचार्य पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययनाची उणीव मोठ्या प्रमाणात भासत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःहून हजर झालेले आहेत.’’

मुलांमुलांनी फुलून गेलेला कृषी विद्यापीठाचा परिसर आणि गजबजलेले वर्ग बघण्यासाठी अध्यापक वर्ग कमालीचा उत्सुक आहे. मात्र, मलाही विद्यार्थ्यांच्या स्वागताची ओढ आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले ‘ऑनलाइन’ अध्यापनाचे वेळापत्रक सध्या लागू आहे. विविध ऑनलाइन परीक्षा यापूर्वीच निश्चित होत्या. त्यामुळे कोविडची नियमावली पाळून कृषी शिक्षणाचे वर्ग दिवाळीनंतरच पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे वाटते.
– डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

News Item ID: 
820-news_story-1634739907-awsecm-658
Mobile Device Headline: 
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणार
Appearance Status Tags: 
Mukhya News
Only after Diwali, agricultural colleges will flourishOnly after Diwali, agricultural colleges will flourish
Mobile Body: 

पुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी विद्यापीठे व संलग्न कृषी महाविद्यालयांमधील वर्ग पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, स्थानिक जिल्हा प्रशासनाची मान्यता आणि लसीकरण अशा दोन मुख्य अटींचे पालन सक्तीचे असल्याने प्रत्यक्षात दिवाळीनंतरच विद्यापीठे व महाविद्यालये गजबजतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

राज्यातील नियमित शिक्षणाचे पहिली ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झालेले आहेत. याशिवाय अकृषी विद्यापीठे व उच्च शिक्षणाची अकृषी महाविद्यालये झाली. त्यामुळे, कृषी शिक्षण संस्थांचे वर्ग केव्हापासून सुरू होणार, याबाबत राज्यभरातून विचारणा सुरू होती. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व ‘कृषी’चे वर्ग बुधवारपासून (ता. २०) सुरू करण्यास मान्यता दिली. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठांचे प्रत्यक्ष पदवीदान समारंभ झालेले नाहीत. तसेच, काही अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग चालू असले तरी प्रत्यक्ष अध्यापनातून होणारे लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष वर्ग होण्यासाठी अध्यापक वर्ग व विद्यार्थी उत्सुक आहेत.

‘‘कृषी शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असली तरी स्थानिक पातळीवर तयारी झाली नाही. स्थानिक प्रशासनाची मान्यता मिळवणे, परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वेगळी तयारी, विद्यार्थ्यांचे लसीकरण याविषयीचे नियोजन बाकी आहे. त्यासाठी दिवाळीपर्यंत कालावधी हवा आहे,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले की, ‘‘आमच्या विद्यापीठाच्या अखत्यारित पाच हजार विद्यार्थी शिकतात. नियोजनाची बाजू किचकट व आव्हानात्मक आहे. नगर जिल्ह्यात कोविडची भीती अद्यापही आहे. परिणामी आम्ही सावधपणे पावले टाकत आहोत. यंदाचा पदवीदान सोहळादेखील निवडक विद्यार्थ्यांसाठी असेल. इतर विद्यार्थी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी होतील.’’

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले म्हणाले की, ‘‘कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष वर्गांत उपस्थित राहून शिक्षण घेण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत. पदव्युत्तर, आचार्य पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययनाची उणीव मोठ्या प्रमाणात भासत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःहून हजर झालेले आहेत.’’

मुलांमुलांनी फुलून गेलेला कृषी विद्यापीठाचा परिसर आणि गजबजलेले वर्ग बघण्यासाठी अध्यापक वर्ग कमालीचा उत्सुक आहे. मात्र, मलाही विद्यार्थ्यांच्या स्वागताची ओढ आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले ‘ऑनलाइन’ अध्यापनाचे वेळापत्रक सध्या लागू आहे. विविध ऑनलाइन परीक्षा यापूर्वीच निश्चित होत्या. त्यामुळे कोविडची नियमावली पाळून कृषी शिक्षणाचे वर्ग दिवाळीनंतरच पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असे वाटते.
– डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

English Headline: 
Agriculture news in Marathi Only after Diwali, agricultural colleges will flourish
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी विद्यापीठ agriculture university पुणे प्रशासन administrations लसीकरण vaccination दिवाळी शिक्षण education कृषी शिक्षण शिक्षण संस्था दादा भुसे dada bhuse वर्षा varsha विषय topics महात्मा फुले नगर अकोला akola पदवी परभणी parbhabi
Search Functional Tags: 
कृषी विद्यापीठ, Agriculture University, पुणे, प्रशासन, Administrations, लसीकरण, Vaccination, दिवाळी, शिक्षण, Education, कृषी शिक्षण, शिक्षण संस्था, दादा भुसे, Dada Bhuse, वर्षा, Varsha, विषय, Topics, महात्मा फुले, नगर, अकोला, Akola, पदवी, परभणी, Parbhabi
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Only after Diwali, agricultural colleges will flourish
Meta Description: 
Only after Diwali, agricultural colleges will flourish
राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी विद्यापीठे व संलग्न कृषी महाविद्यालयांमधील वर्ग पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X